Solapur Weather Update eSakal
सोलापूर

Solapur Weather Update : सोलापूरचा पारा ४३.१ अंश सेल्सिअसवर; रविवारपासून ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता

होळीपासून सोलापूरच्या तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीसच सोलापूरच्या तापमानाने ४४ अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur Weather : सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आत्तापर्यंत ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेला सोलापूरच्या तापमानाचा पारा आज ४३ अंश सेल्सिअस पार झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक व उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली.

सोलापूर शहर व परिसरात आज सूर्य अक्षरश: आग ओकत होता. अंगाची लाहीलाही करणारे कडक ऊन पडू लागल्याने दुपारच्या सुमारास सोलापुरातील रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीचा आधार घेतला जात आहे. बाहेर उन्हाचा कडाका आणि घरात उकाडा, असे दुहेरी संकट सध्या सोलापुरात आहे. सोलापूरच्या तापमानाचा पारा आता ४४ अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

पुढील दोन दिवस शनिवार व रविवार सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त व्यक्त केला आहे. रविवारपासून (ता. ७) गुरुवारपर्यंत (ता. ११) सोलापूर शहर व परिसराचे वातावरण ढगाळ राहील. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने आज व्यक्त केला आहे.

होळीपासून सोलापूरच्या तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीसच सोलापूरच्या तापमानाने ४४ अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल केली आहे. उन्हाळ्यातील आणखी संपूर्ण एप्रिल महिना व मे महिना बाकी आहे. या दोन महिन्यात सोलापूरच्या तापमानाची व उन्हाची काय स्थिती राहील? याची चिंता आता सतावू लागली आहे.

नागपूर शहराचा पारा ४१.४ अंश सेल्सिअसवर

राज्याच्या उपराजधानीत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वर जात असून शुक्रवारी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसा प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा मिळाला. येणारे काही दिवस विदर्भासह शहरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

नागपूरमध्ये चार दिवसांपासून उन्हाचे चटके अधिक तीव्रतेने जाणवू लागले आहे. नागपूर शहरात तापमान ४१.४ अंशांच्यावर गेले असतानाच वर्धा, ब्रह्मपुरी, अकोला व यवतमाळचे कमाल तापमान ४२ अंशांच्यावर गेले आहे. दिवसा उन्हाच्या झळा व रात्री उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असलेल्या नागपूरकरांना गुढीपाडव्यापर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण पुढील चार दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचे ढगाळ वातावरण राहील.

काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागपूरसह गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT