Tejaswi Satpute Social Work
Tejaswi Satpute Social Work e sakal
सोलापूर

दारू गाळणाऱ्या हातांनी बनविला ‘बंजारा’ ब्रॅण्ड! हातभट्टी दारूमुक्तीकडे सोलापूरची वाटचाल

तात्या लांडगे

सोलापूर : दररोज अवैधपणे दोन लाख लिटर हातभट्टी दारूची विक्री होणारा जिल्हा आता हातभट्टी दारू मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. अवैध व्यवसाय करून स्वत: गुन्हेगारीची वाट धरलेल्यांची पुढची पिढी अंधकारात जाऊ द्यायची नाही, यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाला फाईट करत करतच ऑपरेशन परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली. त्यातून ८३६ जणांचे कायमचे परिवर्तन झाले आहे. कला असूनही परिस्थितीमुळे हातभट्टी दारू गाळणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून आता परिवर्तनाचा ‘बंजारा’ ब्रॅण्ड तयार केला आहे.

साताऱ्याहून बदली झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२१ रोजी ऑपरेशन परिवर्तन सुरु केले. अल्पावधीतच त्याची ख्याती लोकसभेपर्यंत पोहचली. गुन्हेगारांवर वचक बसवत सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी व सुसंवाददेखील महत्त्वाचा असतो, हे या ऑपरेशनाने दाखवून दिले. सुरवातीला हातभट्टी दारू गाळणाऱ्या पुरुषांचे तर दुसऱ्या टप्प्यात त्या कुटुंबातील महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळवून दिले. आता भानुदास तांड्यावरील ४५ मुलांनाही अर्थसहाय केले जाणार आहे. तसेच २०० महिलांना ‘उमेद’ व बॅंकांकडून ज़वळपास १५ लाखांचे अर्थसहाय मिळवून देऊन त्यांना कच्चे मटेरियल उपलब्ध करून दिले. त्या महिलांनी विविध वस्तू तयार केल्या. त्याची पाहणी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच मुळेगाव तांडा परिसरात एक मोठा हॉल उपलब्ध करून देऊन त्याठिकाणी ४१ महिलांना शिवणकाम दिले. शालेय विद्यार्थ्यांसह विविध प्रकारचे गणवेश त्याठिकाणी शिलाई होत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता प्राथमिक शाळांमधील मुलांचे गणवेश त्याठिकाणी शिलाई व्हावेत, यादृष्टीने पोलिस अधीक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत. हातभट्टी दारूचा व्यवसाय सोडलेल्यांनी पुन्हा परत फिरून तो व्यवसाय करू नये, हा त्यामागील हेतू आहे.

हातभट्टी दारू आढळल्यास बीट अंमलदारांवर कारवाई

सर्वसामान्यांच्या सुखी संसारात विघ्न आणणारी हातभट्टी दारू पूर्णपणे बंद व्हावी, या हेतूने पोलिस अधीक्षक सातपुते यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' सुरु केले आहे. यामध्ये केवळ हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांचेच परिवर्तन अपेक्षित नसून दारू पिणाऱ्यांचेही परिवर्तन आवश्यक आहे. अजूनही काही गावांमध्ये चोरून दारू विक्री होते. गावातील नागरिकांनी त्याची तक्रार केल्यास आता थेट संबंधित बीट अंमलदारांवरच कारवाई केली जाणार आहे.

ग्रामीण पोलिसांचे उस्मानाबाद ‘एसपीं’ना पत्र

जिल्ह्यातील बहुतेक तांड्यावरील हातभट्टी दारू गाळण्याचा व्यवसाय पोलिसांच्या सततच्या कारवायांमुळे आणि ऑपरेशन परिवर्तनामुळे बंद झाला आहे. पण, सोलापूर आणि तुळजापूरच्या बॉन्ड्रीवरील बक्षी हिप्परगा तांड्यावरील लोक तुळजापूर हद्दीतील खडकी येथे हातभट्टी दारू गाळतात. त्यामुळे उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ठोस कारवाई झाल्यास तेथून शहर-ग्रामीणमध्ये येणारी हातभट्टी बंद होईल, असा विश्वास सोलापूर ग्रामीण पोलिसांना आहे.

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ‘परिवर्तन ब्रॅण्ड’चे प्रदर्शन

‘ऑपरेशन परिवर्तना’तून तांड्यावरील २०० महिलांनी कलाकुसरीच्या विविध वस्तू स्वत: तयार केल्या आहेत. त्यात साड्या, कुशन, ज्वेलरी, महिलांचे स्कार्प अशा वस्तूंचा समावेश आहे. अतिशय आकर्षक व सुंदर अशा वस्तू हातभट्टी गाळणाऱ्या महिलांनी तयार केल्या आहेत. त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी २३ ते २७ जून या काळात ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. त्या वस्तूंना ‘परिवर्तन बंजारा ब्रॅण्ड’ असे नाव देण्यात आले आहे. लोकांना पसंत पडतील अशा आकर्षक वस्तू त्या महिलांनी तयार केल्या आहेत.

ऑपरेशन परिवर्तनाचे यश

  • रोजगार मिळालेले तांड्यावरील पुरुष

  • ४४२

  • कलाकुसरी करणाऱ्या महिला

  • २००

  • नोकरीला लागलेले तरूण

  • १५३

  • हातभट्टी दारूचा व्यवसाय सोडलेले

  • ८३६

अवैध व्यवसायापासून परावृत्त करणे हाच उद्देश

‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत सुरवातीला ज्या तांड्यांवर पोलिसांचा फोकस होता, त्याठिकाणी हातभट्टी दारू गाळणे बंद झाले आहे. त्यानंतर नव्याने काही तांडे तथा गावांचा शोध घेतला असून त्याठिकाणी पोलिसांचा वॉच आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे ऑपरेशन यशस्वी होत आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT