doctor.jpg 
सोलापूर

उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांची बदनामी थांबवण्याची कोणी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा


वेळापूर(सोलापूर): रूग्णसेवेसाठी बांधील डॉक्‍टरांना कोरोना काळातही रुग्णसेवा विनासायास करता यावी म्हणून माळशिरस तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या ' ट्रॅव्हलिंग हिस्ट्री ' बाबतचे तपशील प्रशासनाने डॉक्‍टरांना वेळोवेळी पुरवावेत. संशयित रुग्ण, खाजगी हॉस्पिटल्स, डॉक्‍टरांची बेकायदेशीर केली जाणारी बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या बाबतचे निवेदन माळशिरस होमिपॅथिक तालुका असोसिशनचे अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज माने पाटील आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल ओसिएशनच्या (निमा) अकलूज शाखेचे अध्यक्ष डॉ.प्रविण पाटील यांनी अकलूज उपविभागीय अधिकारी शमा पवार यांना दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या ताप-सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची प्रवास नोंदी उपलब्ध नसल्याने संशयित कोरोना रूग्ण ओळखणे अवघड जाते. हा रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळल्यास काही बेजबाबदार घटकांकडून बेकायदेशीरपणे अपुऱ्या माहितीवर घाईघाईने सोशल मीडियातून डॉक्‍टर व रुग्णालयाच्या बदनामीची मोहीम राबवली जाते. अशा प्रकारची बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. रुग्णांनी स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या भल्यासाठी सत्य 'ट्रॅव्हलिंग-हिस्ट्री' न लपवता डॉक्‍टरांना सांगावी. असेही आवाहन केले आहे. 
रुग्णसेवा करताना खाजगी डॉक्‍टर्स दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात येऊन संसर्ग झाल्याच्या घटना घडतात. या डॉक्‍टरांवर उपचाराची व विमा संरक्षणाची शासनाची कोणती तरतूद आहे याचीही माहिती निवेदनातून मागितली आहे. प्रशासनाची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला असता अकलूज उपविभागीय अधिकारी शमा पवार यांचा भ्रमणध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही. 

बदनामीच्या विरोधात कारवाई 
कर्तव्याच्या भूमिकेतून खाजगी डॉक्‍टर्स उपचार करीत असताना रुग्णाच्या संशयावरून रुग्णालयाचे चित्रण करणे,रुग्ण, डॉक्‍टरांचे नाव प्रसारित करणे,रुग्णालय स्टाफला भीती दाखवणे यातून रुग्णाची,डॉक्‍टरांची विनाकारण बदनामी होते. अशा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई केली जाईल . 
- दीपक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापूर . 

रुग्णांच्या प्रवास नोंदी द्याव्यात 
संशयित रुग्ण सहजपणे डॉक्‍टरांना ओळखता यावेत म्हणून तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या लोकांचे नाव,आधार कार्ड,प्रवासाचा तपशील याबाबत अपडेट्‌स प्रशासकीय यंत्रणांनी व्हाट्‌सअप वरून डॉक्‍टरांपर्यंत पोहोचवावेत. समाजानेही डॉक्‍टरांचे मनोधैर्य वाढवावे. 
- डॉ.पृथ्वीराज माने पाटील, तालुका अध्यक्ष,होमिओपॅथिक असोसिएशन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 3rd ODI: रोहित शर्माचे ५० वे शतक! विराट कोहलीनेही ठोकली फिफ्टी; RO-KO ची मोठ्या विक्रमांना गवसणी

Ladki Bahin Yojana: महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करावी : इम्तियाज जलील

Marathwada Rain: मराठवाड्यात बरसल्या सरी; नांदेड, जालना परिसरात मुसळधार पाऊस

वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड, आरोपीला अटक; नेमकं काय घडलं?

Government Farmer Scheme: महत्त्वाची बातमी! ९७ हजार शेतकऱ्यांना मिळाले ११२ कोटी; आठवड्यात ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होतील ८६७ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT