Songs for Karmalas fans to sing through Facebook Live 
सोलापूर

संचारबंदीच्या काळात "मिले सूर मेरा तुम्हारा...' 

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू असतानाच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक घरातच थांबून आहेत. गेल्या आठवडाभरापासून हीच स्थिती कायम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर करमाळा येथील संदीप पाटील प्रस्तुत मिले सूर मेरा तुम्हारा ऑर्केस्ट्रा टीमकडून चाहत्यांसाठी मनोरंजन म्हणून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गीत, संगीत कार्यक्रम सादर केला जात आहे. 

मिले सूर मेरा तुम्हारा हा पार्श्‍वगायक संदीप पाटील यांनी निर्माण केलेला ऑर्केस्ट्रा असून तो सोलापूर व परिसरातील जिल्ह्यात लोकप्रिय आहे. या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध जयंती उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस, यात्रा यासह जल्लोषी कार्यक्रमांमधून प्रामुख्याने हिंदी, मराठी चित्रपट गीते, लोकगीते आदी गीतांच्या गायनाचे कार्यक्रम सादर केले जातात. परिणामी या ऑर्केस्ट्राचा चाहतावर्ग मोठा आहे. 

सध्या कोरोनामुळे लॉकडाउनची स्थिती असताना सर्व व्यवहार ठप्प आहेत. ऑर्केस्ट्राचे नियोजित कार्यक्रमही रद्द झालेले आहेत. दरम्यान, लॉकडाउन स्थितीत घरीच थांबून असलेल्या काही चाहत्यांनी ऑर्केस्ट्राचे सर्वेसर्वा संदीप पाटील यांच्याकडे ऑनलाइन संगीत कार्यक्रमाची मागणी केली. त्यावर पाटील यांनी फेसबुक लाइव्हचा पर्याय निवडून सायंकाळी दररोज पाच ते सहा या वेळेत त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून करा ओके पद्धतीचे गीतगायन सादर करत आहेत. याप्रसंगी अनेक संगीतप्रेमी या कार्यक्रमाचा आनंद लुटताना आपल्या फर्माईश सादर करत असून पाटील त्या फर्माईश पूर्ण करत गाणी गाऊन चाहत्यांना एक वेगळी संगीत मेजवानी देत आहेत. यासाठी मिले सूर मेरा तुम्हाराची संपूर्ण टीम विशेष परिश्रम घेत आहे. 

दरम्यान, संगीतप्रेमींचे मनोरंजन करतानाच या कार्यक्रमातून पाटील हे नागरिकांनी घरीच थांबावे, स्वच्छता पाळावी, प्रशासनास सहकार्य करावे, सूचना पाळाव्यात, असे आवाहन वारंवार करत कोरोना लढ्यात एकजुटीने प्रशासनास साथ देण्याची विनंतीही करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे संगीतप्रेमींमधून कौतुक होत आहे. सध्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी घरात बसण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आहे. या पार्श्‍वभूमीवरच पार्श्‍वगायक संदीप पाटील हे दररोज किमान एक तासाचा गीतगायन कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT