सोलापूर

गुरुमंत्राद्वारे केले `इतक्या` लाख विद्यार्थी-पालकांचे समुपदेशन

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : कोरोनासंदर्भात घ्यावयाची दक्षता यासाठी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने "गुरुमंत्र' हा उपक्रम सुरु केला आहे. महापालिका व खासगी शाळांतील शिक्षकांनी आतापर्यंत तब्बल 1 लाख 65 हजार कॉल करून शहरातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले आहे. 

महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शहरातील शिक्षकांना दररोज किमान 10 विद्यार्थ्यांना फोन करण्याचे आवाहन केले होते. संचारबंदीमुळे सध्या शाळा बंद असून, विद्यार्थी घरीच आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फोन करुन मार्गदर्शन करुन 'गुरुमंत्र' द्यावा, त्यासाठी 'गुरुमंत्र' हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गेल्या सात-आठ दिवसांत 301 शाळेतील जवळपास 2500 शिक्षकांनी सहभाग घेऊन 1 लाख 65 हजार इतके कॉल केले आहेत. 

'गुरुमंत्र' उपक्रमाअंतर्गत शिक्षकांकडून विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन केले जाते. तसेच पालकांचा व्हॉटऍप ग्रुप करुन विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल मार्गदर्शन व कोरोनाबाबतची जनजागृती केली जाते. तसेच प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना घराबाहेर न जाणे,वारंवार साबणाने हात धुणे,घरातील लोकांना बाहेर जाऊ न देणे,सामाजिक अंतर ठेवणे,खोकताना, शिंकताना रुमालचा वापर करणेबाबत दररोज मार्गदर्शन करतात. पालकांशीही संवाद साधतात. याबाबतीत विद्यार्थी व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे महापालिका आयुक्‍त दीपक तावरे यांनी कौतुक केले असून, अभिनंदनही केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT