railway.jpg 
सोलापूर

दसरा-दिवाळीत म्हैसूर, वाराणसी, हुबळी, यशवंतपूर व सिकंदराबादसाठी विशेष रेल्वे 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः आगामी काळातील सण व उत्सवानिमित्त विशेष एक्‍स्प्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या वतीने या विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 

कोविड-19 साथीच्या आजारामुळे देशाभरात यात्री सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर विशेष यात्री एक्‍सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. रेल्वे प्रशासन सण व उत्सवानिमित्त विशेष एक्‍सप्रेस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विशेष गाड्यांची माहिती खालील प्रमाणे आहे. 
ता.20. ते ता. 26 च्या दरम्यान म्हैसूर ते वाराणसी (गाडी क्रमांक 062229) विशेष एक्‍सप्रेस धावणार आहे तसेच ता.22 ते ता.28 दरम्यान वाराणसी-म्हैसूर विशेष एक्‍सप्रेस धावणार आहे . सदर गाडी म्हैसूर-वाराणसी-म्हैसूर एक्‍सप्रेसच्या वेळेवर धावेल आणि स्थानकावरील थांबे त्याच प्रमाणे असतील. सदर गाडी या कालावधीत आठवड्यातून दोन दिवस धावेल. 

ता.27 ते ता. 01 नोव्हेंबर दरम्यान अहमदाबाद ते यशवंतपूर विशेष एक्‍सप्रेस (गाडी क्र.06501) धावणार आहे आणि ता.25 ते ता. 29 नोव्हेंबर यशवंतपूर-अहमदाबाद विशेष एक्‍सप्रेस धावेल. सदर गाडी पुर्वीच्या अहमदाबाद-यंशवतपूर-अहमदाबाद एक्‍सप्रेसच्या वेळापत्रकानुसार धावेल. सदर गाडी आठवड्यातून एक दिवस धावेल. 
ता. 20 ते ता. 30 नोव्हेंबर दरम्यान हुबळी ते सिकंदराबाद विशेष एक्‍सप्रेस (गाडी क्र.07319) धावेल. तसेच ता.21 ते ता.1 डिसेंबर दरम्यान सिकंदराबाद -हुबळी विशेष एक्‍सप्रेस धावणार आहे पुर्वीच्या हुबळी-सिकंदराबाद-हुबळी एक्‍सप्रेसच्या वेळापत्रकानुसार असेल. ही गाडी या कालावधीत दररोज धावेल. 
ता. 23 ते ता. 27 नोव्हेंबर दरम्यान हुबळी ते वाराणसी विशेष एक्‍सप्रेस धावणार आहे आणि ता. 25 ते ता. 29 नोव्हेंबर वाराणसी-हुबळी विशेष एक्‍सप्रेस धावणार आहे. ही गाडी हुबळी-वाराणसी-हुबळी एक्‍सप्रेसच्या वेळेत धावेल. ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावेल. 
या गाड्यांमध्ये कोणताही अनारक्षित कोच राहणार नाही. सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्यांसाठी राखीव असल्यास द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल. सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल. अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. परंतु प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रवासी प्रवासात कोणतीही अनारक्षित (यूटीएस) तिकीट दिले जाणार नाही असे मध्य रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Amalner Crime : विवाहित असताना, दुसऱ्यांदा बोहल्यावर! ‘सीआरपीएफ’ कर्मचाऱ्याचा प्रताप; महिलेच्या शस्रक्रियेवेळी उघड झाला प्रकार

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

SCROLL FOR NEXT