Sports lovers rush to the spot 
सोलापूर

क्रीडा प्रेमींची जागेसाठी पळापळ

अलताफ कडकाले

सोलापूर : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सुमारे 12 कोटी रुपयांचे काम आहे. यासाठी स्टेडियम बंद करण्यात आले आहे. परंतु, याठिकाणी चालणाऱ्या क्रिकेट, योगा, तलवारबाजी, कराटे तसेच व्यायामासाठी येणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. क्रिकेटच्या सरावासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांची पळापळ सुरू आहे. 

सोमवारी (ता. 20) जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी आयुक्त दीपक तावरे यांना निवेदन दिले होते. या वेळी आयुक्‍तांनी पर्यायी लक्ष्मी-विष्णू मिलची महापालिकेच्या ताब्यात असलेली जागा पाहण्यासाठी सांगितले होते. आज जागेची पाहणी केली असता क्रिकेटच्या सरावासाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. यामुळे आता पुन्हा नवीन जागेची पाहणी करावी लागणार आहे. याचवेळी शहराच्या मध्यवर्ती जागा असावी असे सर्वांनी सुचविले. ही जागा आता पाहण्यात येणार आहे. 

नाॅर्थकोटच्या मागील जागेचा विचार व्हावा
क्रिकेट किंवा अन्य खेळाच्या सरावासाठी लक्ष्मी-विष्णू मिलची महापालिकेच्या ताब्यातील जागा योग्य नाही. यामुळे या जागेला चांगला पर्याय हा नॉर्थकोटच्या मागील मोकळ्या जागेचा होऊ शकतो. त्यामुळे ही जागा क्रीडाप्रेमींसाठी सरावासाठी उपलब्ध करून द्यावी. यामुळे मुलांना ये-जा करण्यासाठी जवळचे राहील आणि वेळही वाचेल. त्यामुळे या जागेसाठी विचार व्हावा. 
- महेश गादेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते

मध्यवर्ती जागा असावी
पर्यायी जागेत म्हणजे लक्ष्मी-विष्णू मिलची महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेत मैदान तयार करण्यासाठी उशीर लागणार आहे. यासाठी महापालिकेला स्वतंत्र बजेटचीही तरतूद करावी लागेल. याठिकाणी सरावासाठी मैदान तयार करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल. याठिकाणी मोठ मोठे दगड, खडक, झाडी वाढलेली आहे. पार्क स्टेडियम वर्षभरात तयार होईल. यानंतर सुवर्णकाळ असणार आहे. आता सरावापुरते शासनाची मध्यवर्ती असलेली जागा विचाराधीन असून ही जागा दिली तरी चालणार आहे. नॉर्थकोटच्या मागील जागा पर्याय असू शकतो. याचा विचार व्हावा. 
- नागेश वल्याळ, नगरसेवक 

मैदान लवकर उपलब्ध व्हावे
क्रिकेटच्या सरावासाठी आम्ही महापालिकेच्या आयुक्‍तांना काल भेटलो होतो. त्यांनी आम्हाला लक्ष्मी-विष्णू मिलची महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागा सुचवली होती. या जागेची आज पाहणी केली असता याठिकाणी लवकरात लवकर मैदान तयार होणे शक्‍य नाही. सध्या 14, 16 व 19 वर्षांखालील मुला व मुलींच्या स्पर्धांचा काळ आहे. यामुळे या मुलांना सराव करण्यासाठी मैदान लवकरात लवकर उपलब्ध व्हावे. लक्ष्मी-विष्णू मिलची महापालिकेच्या ताब्यात असलेली जागा योग्य नसल्याने शहराच्या मध्यवर्ती असलेली जागा मिळावी. 
- चंद्रकांत रेम्बुर्स, सचिव, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन 

सध्या पाहिलेली जागा अयोग्य
या जागेत मैदान तयार होण्यास पाच ते सहा महिने लागतील. हे अवघड आहे. मुलांना क्रिकेटच्या सरावासाठी दुसऱ्या पर्यायी जागेची व्यवस्था करावी. यासाठी नॉर्थकोर्टच्या मागील जागेवर क्‍लबला सरावासाठी मान्यता द्यावी. सध्या पाहिलेली जागा योग्य नाही. यामुळे मध्यवर्तीची जागा मिळावी. 
- के. टी. पवार, ज्येष्ठ क्रिकेटपटू 

थांबणे शक्य नाही
क्रिकेट खेळाच्या सरावासाठी मैदान मिळावे. याठिकाणी चार ते पाच महिने थांबून सराव करणे शक्‍य नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी जागा मिळावी. शक्‍यतो मध्यवर्ती जागा मिळावी. कारण, सरावासाठी लहान मुले येत असतात. त्यांना अनेक अडचणी येतील. 
- किशोर बोरामणी, ज्येष्ठ क्रिकेटपटू 

क्रिकेट खेळाडूंना पर्यायी जागा द्यावी 
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सुमारे 12 कोटी रुपयांचे काम आहे. या कामामुळे स्टेडियम सुमारे एक वर्ष बंद राहणार आहे. क्रिकेट खेळाडूंना सरावास मुकावे लागणार आहे. महापालिकेने पर्यायी जागा क्रिकेट सरावासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. नूतनीकरण करण्यात येत असल्याने खेळाडूंनी त्यांचे स्वागत केले. स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होतील. खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून सरावासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी क्रीडाप्रेमी व क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या वेळी चंद्रकांत रेम्बर्सू, के. टी. पवार, किशोर बोरामणी, मल्लिनाथ याळगी, नागेश राव, संजय मोरे, श्रीनिवास शिवाळ, संकेत शहा उपस्थित होते. 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

NEET 2026 Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात

IPL 2026: पंजाबच्या सलग ६ व्या पराभवानंतर प्रीती झिंटाची स्टेडियममध्येच गंभीर चर्चा; रिकी पाँटिंगचाही चेहरा उतरला

Ahilyanagar Murder Case: अहिल्यानगरमध्ये पुतण्याचा खून करून फरार आरोपीला २४ तासांत अटक; १० लाखांची रोकड जप्त..

Ramdas Athawale: मंत्री आठवलेंकडून पुन्हा शिर्डीतून लढण्याचे संकेत; कार्यकर्त्यांसोबत संवादानंतर व्यक्त केली भावना, 'जनतेचे प्रेम फेडायचे आहे'

SCROLL FOR NEXT