st sakal
सोलापूर

आजपासून 'एसटी' प्रवास महागणार! डिझेल दरवाढीचा परिणाम

आजपासून 'एसटी' प्रवास महागणार! डिझेल दरवाढीचा परिणाम

विजय थोरात

राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सोलापूर : दररोज वाढणाऱ्या पेट्रोल (Petrol)- डिझेलच्या (Diesel) किमती नवा उच्चांक गाठत आहेत तर दुसरीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. अशा विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) लालपरीच्या तिकीट दरात सोमवारी (ता. 25) मध्यरात्रीपासून वाढ होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तिकीट दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाची एसटीची बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. अनलॉकनंतर लाल परीची चाके हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. एसटी बस बंद असल्याने उत्पन्नात घट झाल्याने एसटीच्या संचित तोट्यात मोठी वाढ झाली आहे. जवळपास 12 हजार कोटींचा तोटा सहन करत वाढते पेट्रोल व डिझेलचे दर, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचे वेतन अशा नानाविध कारणांमुळे महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 17 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत तिकीट दरवाढ होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून, आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून नव्याने तिकीट दर लागू केले जाणार आहेत. होणाऱ्या तिकीट दरवाढीला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

2018 मध्ये झाली होती 20 टक्‍क्‍यांची दरवाढ

दोन वर्षांपूर्वी अर्थात 2018 मध्ये दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने 20 टक्के भाडेवाढ केली होती. त्यांनतर आता डिझेलचे वाढलेले दर व कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळ भाडेवाढ करण्याच्या तयारीत आहे. भाडेवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिवशाही बसने पुण्याला जाण्यासाठी आता प्रवाशांना 545 रुपये मोजावे लागणार आहेत. सोमवारी (ता. 25) रात्री 12 पासून नवे दर लागू करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनांकडून सांगण्यात आले आहे. याचा

असे असणार नवे दर

  • मार्ग दर - साधी - रातराणी - निमआराम - शिवशाही

  • सोलापूर ते पुणे - 365 - 365 - 500 - 545

  • पंढरपूर ते पुणे - 315 - 315 - 425 - 465

  • अक्‍कलकोट ते पुणे - 425 - 425 - 580 - 635

  • अकलूज ते परेल - 470 - 470 - 640 - 700

प्रशासनाकडून भाडेवाढीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मंगळवार (ता. 26) पासून नव्या तिकीट दराप्रमाणे दर आकारले जाणार आहेत.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT