सोलापूर

या जिल्ह्यात खरीप पिकाच्या पेरणीला प्रारंभ 

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे काही भागात शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीला सुरवात केल्याचे चित्र दिसत आहे. येत्या हंगामात पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरण्याचा पहिला मान मिळवला आहे. 

जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाची हजेरी 
सोलापूर जिल्ह्यात आठवडभरात कमी -अधिक प्रमाणात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी आता पेरणीसाठी बी -बियाण्याची जमवाजमव करू लागले आहेत. मात्र, पूर्व मोसमी पावसानंतर जमिनीला वाफसा येताच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. आढीव (ता. पंढरपूर) परिसरातील काही शेतकऱ्यांनी पावसाचे प्रमाण कमी असले तरी असेल त्या ओलीत पेरणीला सुरवात केली आहे. 

मका पेरणीला दिले महत्त्व 
चारा आणि धान्य या दोन्हीसाठी मका फायदेशीर असल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी मका पेरणीला अधिक महत्त्व दिले आहे. तर काही भागातील शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर व सोयाबिनसारख्या कडधान्याच्या पेरणीला महत्त्व दिले आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर कडधान्य पेरणीचे तर भरवशाचे पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी मका व कांदा पेरणीचे नियोजन केले आहे. 

पिकाला चांगला फायदा होईल 
आमच्याकडे पाऊस तसा कमीच पडला आहे. मात्र, पाण्याची सोय असल्याने आम्ही लवकरच पेरणी केली. पुढे पडणाऱ्या पावसाचा मका पिकाला चांगला फायदा होईल. 
- अंकुश चव्हाण, 
शेतकरी, आढीव, ता. पंढरपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT