सोलापूर

राज्यातील शाळांमध्ये वाजणार दिवसातून तीन वेळा "वॉटर बेल' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : राज्यातील शाळांमध्ये आता दिवसातून तीन वेळा "वॉटर बेल' वाजणार आहे. या संदर्भातील आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज (मंगळवारी) जारी केले. वेळ निश्‍चित करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे. 

दिवसांतून तीन वेळा वाजणार वाॅटर बेल
विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये "वॉटर बेल' हा उपक्रम राबविण्याचे आदेश  दिले. शाळेच्या वेळेत तीनदा "वॉटर बेल' वाजवावी. त्याची वेळ संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी निश्‍चित करावी, असे आदेशात म्हटले आहे. अभ्यास आणि खेळण्याच्या नादात मुले पाणी पिण्याचे विसरून जातात. त्यामुळे शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळेला "वॉटर बेल' वाजवावी आणि मुलांना पाणी पिण्यास सांगावे. परिणामी त्यांची पाणी पिण्याबाबत मानसिकता तयार होईल व पुढे सवय होईल. तसेच या वेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभाही उपलब्ध करून द्यावी, असे या संदर्भातील आदेशात म्हटले आहे. 

आरोग्यावर परिणामाची शक्यता 
प्रौढासह शालेय विद्यार्थ्यांना दिवसभरात एक ते तीन लिटर पाणी पिणे आवश्‍यक असते. परंतु, कामाच्या गडबडीत पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. शाळेत मध्यांतरात डबा खाल्यानंतर विद्यार्थी पुरेसे पाणी पितीलच असे नाही. शाळेत पाच ते सहा तास असताना ते एखाद वेळेसच पाणी पितात. त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्‍यता असते. पाण्याचे प्रमाण उंची, वय आणि वजनानुसार बदलते. पाण्याने भरलेली बाटली मुले तशीच घरी आणतात. पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा येणे, मुत्रमार्गात संसर्ग होणे, किडनी स्टोन होणे, चिडचिडेपणा वाढणे हे प्रकार होतात. 

प्रातिनिधीक उपक्रम झाला बंधनकारक
दिवसातून अनेक वेळा पाणी पिण्याची सवय लहानपणापासूनच लागावी, यासाठी केरळ, कर्नाटक, तेलंगणा येथील शाळांमध्ये "वॉटर बेल' हा उपक्रम राबविला जातो. शाळेच्या वेळेत खास पाणी पिण्यासाठी दोन वेळा बेल वाजवली जाते. त्या वेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक पाणी पितात. हा उपक्रम उपयुक्त असल्यामुळे काही शाळांनी स्वत:हून "वॉटर बेल'चा उपक्रम सुरू केला. सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही शाळांमध्येही प्रातिनिधीक स्तरावर हा उपक्रम राबविला गेला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT