police logo 
सोलापूर

सोलापुरात जमावबंदीची कठोर अंमलबजावणी 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सोलापूर शहर पोलिस प्रशासन सरसावले आहे. शहरात गर्दी होऊ नये यासाठी यापूर्वीच लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे काटेकोर व कठोरपणे पालन करण्यास आजपासून सुरवात झाली आहे. सोलापुरातील प्रमुख चौक, चहाची दुकाने, बाजारपेठा येथे गर्दी करणाऱ्या नागरिकांना मोबाईल व्हॅनद्वारे सूचना देऊन गर्दी कमी केली जात आहे. 
हेही वाचा - सोलापूरला गुडन्यूज : प्रयोगशाळेला मिळणार पन्नास लाखांची यंत्रसामग्री 
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 14 मार्च रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम लागू केला आहे. आयपीसी कलम 144 नूसार जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला आहे. आज सकाळपासून सोलापूर शहरातील जमावबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. पोलिसांनी मास्क वापरावे अशी सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली आहे. सोलापूर शहरातील लग्न सोहळे आज साध्या पद्धतीने व मोजक्‍या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत पार पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT