lockdown1.jpg
lockdown1.jpg 
सोलापूर

माढ्यात सात दिवसीय जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद, बाजारपेठ बंद !

किरण चव्हाण

माढा (सोलापूर): माढा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून सोमवारपर्यंत ( ता. 10 ) जनता कर्फ्यू पुकारण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे यांनी दिली. मंगळवारी (ता. 4) जनता कर्फ्यूला नागरिक व व्यापाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. 

माढयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात सोमवारी (ता. 3) नवीन सात रुग्ण्‌ सापडले. शहरातील शुक्रवार पेठ, भांगे गल्ली, शिवाजीनगर, संतसेनानगर यासारख्या भागात रूग्ण आढळून आले आहेत. मात्र मागील दोन - तीन दिवसांत शहरात रुग्णसंख्या वाढत असताना मंगळवारी (ता. 4) मात्र शहरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. यासंदर्भात काल सोमवारी (ता. 3) सायंकाळी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस माढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, दादासाहेब साठे, माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने, गुरुराज कानडे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी यांची मते जाणून घेऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. 

जनता कर्फ्यूच्या कालावधीत दवाखाने, मेडिकल दुकाने यासारख्या वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. सकाळ्‌ सात ते नऊ व रात्री सात ते नऊ दुग्ध व्यवसाय सुरू राहणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शासन, नगरपंचयात, आरोग्य विभाग यांनी दिलेल्या सुचनांचे वेळोवेळी पालन करावे. आपल्या कुटुंबासह माढा शहराच्या सुरक्षेसाठी या जनता कर्फ्यूचे पालन करावे व सुरक्षित रहावे असे आवाहन ऍड. साठे यांनी केले. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT