सोलापूर

सकाळी बहिणीसोबत झाले भांडण अन्‌ दुपारी.. 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातल्या शांतीनिकेत शाळेत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सोनाली जयसिंग पंतूवाले (वय 11, रा. महाराणा प्रताप झोपडपट्टी, कुमठा नाका, सोलापूर) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सकाळी बहिणीसोबत ओढणीच्या कारणावरून भांडण झाले होते, त्याच कारणावरून सोनालीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बालाजी मस्के यांनी सांगितले. 

त्यांची मैत्री असेल किंवा आणखी काय तुम्हाला काय? (Video) -

सोनालीचे आणि तिच्या बहिणीचे सोमवारी सकाळी ओढणीच्या कारणावरून भांडण झाले. शाळेची काळी ओढणी सोनालीला हवी होती, पण ओढणी बहिणीने न दिल्याच्या कारणावरून सोनाली मानसिक तणावाखाली होती. दुपारी बाराच्या सुमारास शाळेला जाण्यासाठी तयार झाली होती. आई वडीचे माप देण्यासाठी गेली होती. तिची आजी बाजूच्या घरात बसली होती. सोनालीने घराचा दरवाजा लाऊन घेतला आणि घरातल्या खुंटीला ओढणीने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी सोनाली बाहेर येत असल्याने आजीने आवाज दिला. काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आजीने शेजारच्या तरुणाला पाहण्यास सांगितले. आतमध्ये सोनालीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला खाली उतरवून काका दीपक पंतूवाले यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तोवर सोनालीचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे. 

सोनालीच्या वडीलांचे निधन झाले आहे. तिच्या मागे घरात आई, दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT