solapur univercity Esakal
सोलापूर

3100 ठिकाणांहून विद्यार्थ्यांनी दिली विद्यापीठाची PET! 1021 गैरहजर; विद्यापीठाची पहिलीच ऑनलाइन परीक्षा यशस्वी; वेब बेस्‌ड परीक्षेत 180 जणांवर कारवाई

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ४७४ पीएच.डी.च्या जागांसाठी आज (मंगळवारी) ‘पेट’ पार पडली. सोलापूरसह देशभरातील तीन हजार २६७ जणांनी विविध ठिकाणांहून यशस्वीपणे परीक्षा दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ४७४ पीएच.डी.च्या जागांसाठी आज (मंगळवारी) ‘पेट’ पार पडली. सोलापूरसह देशभरातील तीन हजार २६७ जणांनी विविध ठिकाणांहून यशस्वीपणे परीक्षा दिली. सुरवातीला काहीवेळ सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना लॉगइनसाठी अडचणी आल्या; त्या हेल्पलाइनवरून सोडविण्यात आल्या. तरीपण, काही विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र समिती नेमली आहे.

विद्यापीठाने पहिल्यांदाच हायटेक पाऊल उचलून ‘पेट’ ऑनलाइन पद्धतीने घेतली. तत्पूर्वी, २५ व २६ जुलैला मॉक टेस्ट देखील घेतली होती. त्यामुळे परीक्षार्थींना फारशा अडचणींचा सामना करावा लागना नाही. काहींना नेटवर्क कमी असल्याने वेळेत लॉगइन करता आले नाही, पण तीन हजार ८७ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. वेब बेस्‌ड परीक्षेच्या सूचनांचे पालन न केलेल्या १८० जणांवर कारवाई करण्यात आली आणि ते आपोआप परीक्षेतून लॉग-आउट झाले. त्यांच्या शेजारी कोणीतरी होते, परीक्षार्थी किंवा समोरील व्यक्ती एकमेकांशी बोलत होते, परीक्षार्थींची नजर इतरत्र गेल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात तक्रारी केल्या आहेत, त्यांचा डेटा घेऊन त्या तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे. सध्या पावसाळा सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा देणे अशक्य होते. पण, विद्यापीठाच्या या ऑनलाइन वेब बेस्‌ड प्रणालीमुळे त्यांना त्यांच्याच घरातून परीक्षा देता आल्याने अनेकांनी विद्यापीठाचे आभार मानले.

विद्यापीठाच्या ‘पेट’ची स्थिती

  • ‘पीएच.डी’च्या जागा

  • ४७४

  • एकूण अर्जदार

  • ४,२८८

  • परीक्षा दिलेले विद्यार्थी

  • ३,२६७

  • परीक्षेला गैरहजर

  • १,०२१

  • परीक्षेवेळी कारवाई

  • १८०

पहिलीची ऑनलाइन ‘पेट’ पारदर्शकपणे यशस्वी

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे या सर्वांच्याच नेतृत्वात विद्यापीठाची पहिलीच ऑनलाइन वेब बेस्‌ड ‘पेट’ यशस्वीपणे पार पडली आहे. विद्यार्थ्यांना लॉगइनवेळी आलेल्या अडचणी काही वेळात सोडविण्यात यश आले. परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. आता १५ दिवसांनी निकाल जाहीर होईल.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT