डॉ शीतलकुमार रसाळ Sakal
सोलापूर

यशोगाथा : वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा ते तहसीलदार पदापर्यंतचा प्रवास

जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षेसाठी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन, एमपीएससीतुन चौथ्या प्रयत्नात तहसीलदार झालेले डॉ शीतलकुमार रसाळ.

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : सातत्याने अपयश येऊन देखील, मनाशी बाळगलेले स्वप्न काहीही झाले तरी, पूर्ण केल्याशिवाय थांबायचे नाही. हि मनाशी खूणगाठ बांधून. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षेसाठी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन, एमपीएससीतुन चौथ्या प्रयत्नात तहसीलदार झालेले डॉ शीतलकुमार रसाळ. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबांची शिक्षकांचे कुटुंब अशी ओळख आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

तहसीलदार डॉ शीतलकुमार सांगतात की, करकंब हे माझ मुळ गाव. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. घरची परिस्थिती मध्यम होती. वडील शिक्षक, भाऊ शिक्षक, बहीण शिक्षक अन् वहिनीही शिक्षक असल्याने कुटुंबांची परिसरात 'शिक्षकांचे कुटुंब' अशी एक वेगळी ओळख होती. शिक्षणाचे धडे लहानपणापासूनच घरात मिळत गेले. कुटुंबातील सर्वांची इच्छा होती की, मी एक डॉक्टर व्हाव. म्हणून सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तशी जडणघडण सुरू होती.

गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अव्वल असल्याने माध्यमिक शिक्षण सुरू असताना, नवोदयच्या परीक्षेत यश संपादन केल्याने. पुढील शिक्षणासाठी पोखरापूर येथे प्रवेश मिळाला. खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेची आवड येथे शिक्षण घेत असताना निर्माण झाली. पुढे दहावी बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर. स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा असताना देखील ही, आई-वडिलांच्या इच्छेनुसार मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला.

लहानपणापासूनच एक सवय होती की, जे काम हाती घेतले आहे. ते पुर्ण झाल्याशिवाय इतर गोष्टीत लक्ष घालायचे नाही. त्यामुळे कोल्हापूर येथील डि वाय पाटील कॉलेजला एमबीबीएसला नंबर लागल्यानंतर ते व्यवस्थितरित्या पुर्ण करण्यासाठी स्वतः ला पुर्णपणे झोकून दिले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच पुणे जिल्ह्यातील वरवंड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झालो. अन् आरोग्य सेवा सुरू झाली. कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण केल्याचे एक मानसिक समाधान वाटत होते. परंतु स्पर्धा परीक्षेचे असलेले आकर्षण अद्याप सुटलेले नव्हते. त्यामुळे पुन्हा स्पर्धा परीक्षेचा करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला अन् पुण्यात एक खाजगी नोकरी स्वीकारून अभ्यास सुरू केला.

नोकरी करत स्पर्धा परीक्षेत नशीब अजमावयाचे म्हणून सर्वतोपरीने प्रयत्न सुरू होते. पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करता येईल अशी अपेक्षा असताना मुलाखतीत गुण कमी मिळाल्याने अपयशास सामोरे जावे लागले. दुसऱ्या प्रयत्नातही अपयश आल्याने, मात्र चांगलेच खच्चीकरण झाले. चांगली नोकरी सोडून काय करतोय असा प्रश्न कुटुंबांकडून उपस्थित होऊ लागला. परंतु मी हार मानायची नाही एवढं पक्क ठरवलेले होते. पाठिमागील चुकांची पुनरावृत्ती टाळत. नव्या उमेदीने पुन्हा परिक्षेस सामोरे गेलो.

अन् तिसऱ्या प्रयत्नात पहिल यश संपादन करता आले. नायब तहसीलदारपदी निवड झाली. त्यामुळे एक दांडगा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. चिकाटी व त्याला अभ्यासाच्या जोरावर परत एकदा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. चौथ्या प्रयत्नात एमपीएससीतुन तहसीलदारपदी निवड झाली. या यशाचे भागीदार कुटुंबातील सदस्य तितकेच मित्रपरिवार आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे यश संपादन करता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT