gio tag photo.jpg 
सोलापूर

वृक्ष संवर्धनासाठी "जीओटॅग ऍप'चा वापर होतोय यशस्वी : शंकरराव मोहिते महाविद्यालयाची कामगिरी 

शशिकांत कडबाने

अकलूज(सोलापूर) : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन गरजेचे असून शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या पर्यावरण अभ्यास विभागाने वृक्ष संवर्धनाच्या नोंदीसाठी 'जीओटॅग ऍप' चा प्रभावीपणे वापर करून वृक्षसंवर्धनात एक पथदर्शी कार्य केले आहे. 

दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे झाडांची खुलेआम कत्तल होत आहे. पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी नवीन वृक्ष लागवड व संवर्धन करणे गरजेचे आहे. 

शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड करण्याचे धोरण अवलंबिले जाते. परंतु, त्यातील बऱ्याचशा वृक्षांची जोपासना होत नाही. काही संस्था व्यक्ती वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतात. परंतू संवर्धनासाठी काहीच करत नाही. परिणामी ही झाडे न वाढता जळून जातात. त्यासाठी वृक्ष संगोपन करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या पर्यावरण आभ्यास विभागाने अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. या विभागाचे प्रमुख प्रा. बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पर्यावरण विषय शिकण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष योगदान द्या, प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करा, असे आवाहन करीत गत वर्षी शुक्रवार (13सप्टेंबर2019) रोजी माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालयातील शास्र, वाणिज्य व कला शाखेतील द्वितीय वर्षातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोप दिले आणि आपआपल्या शेतात अथवा घरपरीसरात लागवड करण्यास सांगितले. प्रत्येक विद्यार्थी झाड लाऊन त्याचे संगोपन करतो का, याच्या माहितीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास 'जीओटॅग ऍप' डाउनलोड करून लावलेल्या रोपाचा फोटो काढून आपलोड करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी फोटो अपलोड केले. त्याची नोंद महाविद्यालयातील संगणकावर घेण्यात आली. त्यानंतर सहा महिन्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना परत त्या रोपांचे फोटो पाठविण्याबाबत अवाहन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपआपल्या रोपांचे फोटो पाठविले. त्यानंतर बरोबर एक वर्षांनी सप्टेंबर 2020 च्या 1 तारखेनंतर सर्व विद्यार्थ्यांना फोटो पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्यानुसार आज शनिवारी (ता.13) सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांनी आपआपल्या झाडांचे फोटो अपलोड केले आहेत. या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, संचालक संग्रामसिंह मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 


एैंशी टक्के रोपांचे चांगले संगोपन 
शुक्रवार ता. 13 सप्टेंबर 2019 रोजी सुमारे 1000 रोपांचे वाटप, 13 ते 20 सप्टेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी रोपाची लागवड करून जिओटॅग ऍपने फोटो पाठवले. त्यानंतर सहा महिन्यानी 15 ते 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत रोपाच्या वाढीचे फोटो पाठवले. शनिवार (13 सप्टेंबर 2020) रोजी सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांनी आपआपल्या मोठ्या झालेल्या रोपांचे फोटो पाठविले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT