oxymeter.jpg 
सोलापूर

मंगळवेढ्यात शुगर व ऑक्‍सीजन तपासणी मोहिम

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा(सोलापूर)ः जिल्ह्यात कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता शहरात नगरपरिषदेकडून साथरोगाचे सर्व्हे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्‍वसनास त्रास, धाप लागणे, शुगर, रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आदी आजारांची तपासणी केली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

एक महिन्यापूर्वी थर्मल स्क्रनिंगद्वारे शरीरातील तापमान तपासणी केली. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण शहरातून थर्मल स्क्रनिंग, ग्लुकोमीटरद्वारे शुगर व ऑक्‍सिमीटरद्वारे रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासणीेचे काम युद्धपातळीवर सुरू केले. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करणे व शहरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे. 

शहरात नगरपालिक कर्मचारी, शिक्षण मंडळाच्या शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सर्वेक्षण सुरू आहे. थर्मल स्क्रिनिंगद्वारे शरीराचे तापमान तपासणी करून जादा तापमानाची नोंद झालेल्यांना ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविण्यात येते. तर पथकाने ऑक्‍सिमीटरद्वारे रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासण्याचे काम चालवले आहे. ज्या 50 ते 55 वर्षे वयोगटातील नागरिकांना मधुमेहाचा त्रास आहे. ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन शुगर तपासणी शक्‍य नाही अशा नागरिकांची प्रत्यक्ष जागेवर तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. 

नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी 
शासनाने काही प्रमाणात निर्बंध घालून उद्योग, व्यापार व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. नागरिकांनीच आत दैनंदिन जीवनात सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, सतत हात धुणे या सवयी स्वतःला लावून घ्याव्यात. इतर ठिकाणांवरून आलेल्या नागरिकांची माहिती द्यावी व शहराचा नावलौकिक कायम ठेवावा. काही अडचण असल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा. 
-अरुणा माळी, नगराध्यक्षा  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT