fulchokhya gharate2.jpg
fulchokhya gharate2.jpg 
सोलापूर

स्मृतीवनाच्या हिरवाईत सुगरण, होला व मुनिया पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः परिसरात झालेल्या जोरदार पावसासोबत शहरातील स्मृतीवनाचा परिसर हिरवाईने नटला आहे. अनेक प्रकारची रानफुले या परिसरात फुलली आहेत. अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटी दिसु लागली आहेत. सुगरण, होला, मुनिया व चश्‍मेवाला या प्रकारच्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरु झाल्याने आता या भागात झाडांवर बांधलेली घरटी लक्ष वेधून घेत आहेत. 

मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शहरातील स्मृतीवनाचा परिसर हिरवाईने नटला आहे. उमलेली रानफुले व पक्ष्यांच्या चिवचिवाटाने हा परिसर अगदी फुलून गेला आहे. शहरातील स्मृतीवनाच्या परिसरात पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असतो. या ठिकाणी वृक्षांची मोठी संख्या आहे. या वर्षी पावसाने अगदी लवकरच हजेरी लावली. सतत सुरू असलेल्या पावसाने हा जंगल परिसर हिरवागार झाला आहे. या परिसरात चालण्यासाठी असलेल्या रस्त्यांच्या कडेची बाजू हिरवी झाली आहे. दिनानाथ, कुसळी गवत आणी शेडा असे गवताचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. 

त्यासोबत रान फुलांचा देखील बहर आला आहे. रानतीळ, इचका, मुकन, दगडी फुल, सोनकी, रुई, अलमंडा, शंखपुष्पी, गौरी चौरी, वेलतार, बिट्टी, शेंद्री या सारख्या अनेक रानफुले अगदी बहरून आली आहेत. निरगुडी, बहावा, अडुळसा, रातराणी अशा झाडांपैकी काही झाडांना बहर आला आहे. पाऊस पडला की वर्षायू असलेल्या रानफुलाची रोपे तरारली आहेत. त्यांच्या फुलांच्या बहराने हिरव्या गवतामध्ये दिसणारी ही फुलांची बहार लक्ष वेधून घेणारी आहे. 

स्मृतीवनाच्यालगत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावात पावसाने पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पाणपक्षी देखील विपूल प्रमाणात आहेत. या स्मृतीवनाच्या परिसरात सुगरण, चश्‍मेवाला, मुनीया, होला अशा पक्ष्यांची घरटी दिसू लागली आहेत. तलावामध्ये मंचक, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, हळदीकुंकू असे पाणपक्ष्यांचे प्रकार सहज दिसतात. हा परिसर बंदिस्त असल्याने अगदी मानवी हस्तक्षेप कमी असल्याने पक्ष्यांची वस्ती कायम असते. 


पक्ष्यांचा वावर वाढतोय 
यावर्षी अगदी सुरवातीपासून चांगला पाऊस झाल्याने स्मृतीवनाच्या परिसर हिरवागार झाला आहे. लगत असलेल्या तलावामूळे इतर पक्ष्यांप्रमाणे पाणपक्ष्यांची देखील घरटी दिसून येतात. 
- संजय भोईटे, निसर्ग अभ्यासक.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT