Lingade 
सोलापूर

सासरच्या त्रासाला कंटाळून जैनवाडीत विवाहितेची आत्महत्या

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : स्वयंपाक नीट करता येत नाही, लग्नात जावयाचा मानपान केला नाही म्हणून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून जैनवाडी (ता. पंढरपूर) येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूजा महेश लिंगडे (वय 21, रा. जैनवाडी) असे विवाहितेचे नाव आहे. सोमवारी (ता. 10) सकाळी तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पूजा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी जैनवाडी येथील महेश लिंगडे याच्याशी झाला होता. तेव्हापासून तिला स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून आणि मानपानावरून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून पूजा मागील काही दिवसांपासून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील आई-वडिलांकडे राहात होती. परत सासरी नांदायला जायला तयार नव्हती. मात्र पती महेश याने फोनवरून "पूजाला आजच्या आज पाठवा, नाहीतर परत नांदवणार नाही' असा निरोप दिल्याने भाऊ चैतन्य, आई व मामा यांनी मुलाबाळांसह पूजाला सासरी नेऊन सोडले होते. त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी पूजाला मारहाण झाल्याचा फोन आला होता. परंतु सकाळी बघू, असे म्हणून पूजाच्या माहेरच्या लोकांनी समजूत काढली होती. दुसऱ्या दिवशीच 12 वाजता पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्या मंडळींना कळाली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT