Pipeline
Pipeline Canva
सोलापूर

'24 गाव शेती पाणीपुरवठा योजनेच्या योग्यतेबाबत आताच लक्ष द्या!'

गुरुदेव स्वामी

मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण दुष्काळी भागातील 24 गावांच्या शेतीसाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा सर्व्हे सुरू आहे.

भोसे (सोलापूर) : सध्या महाविकास आघाडी सरकारमार्फत (Mahavikas Aghadi government) मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण दुष्काळी भागातील 24 गावांच्या शेतीसाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे (Closed pipeline) पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा सर्व्हे सुरू आहे. हा सर्व्हे योग्य पद्धतीने होतो की नाही या कामी लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया दक्षिण दुष्काळी भागातील 24 गावांतील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. (Survey of 24 village agricultural water supply schemes in Mangalwedha is underway)

सध्या या योजनेत समावेश असलेल्या 24 गाव व परिसरामध्ये पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासंबधी सर्व्हे सुरू आहे. परंतु हा सर्व्हे करताना शासनाचे अधिकारी सरळ पाइप टाकण्याचा सर्व्हे करून देतात. त्यात अंतर वाचवतात व कमी खर्चात ही योजना कशी होईल अशा पद्धतीने सर्व्हे केला जातो. असे यापूर्वी कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यात अशा बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात आले असून, त्या वेळी झालेल्या सर्व्हेतून बरेच तलाव वगळता तलावाच्या बाजूने बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी गेल्याने बरेच तलाव पाणी शेजारून जाऊन देखील कोरडे राहिले आहेत. ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे त्यामुळे विद्युत पंप बंद झाले की पाणी बंद होते. शिवाय बऱ्याच वेळा पंपाचा बिघाड पाचवीला पूजलेला आसतो. आज तासगाव कवठेमहांकाळ भागातील लोकांच्या हे वास्तव लक्षात आले व टाहो फोडून आक्रोश व आंदोलने उभी राहिली. परंतु आता नव्याने इस्टिमेट, तलावात जलवाहिन्या टाकण्याचा वाढीव खर्च, त्यासाठी अंदाजपत्रक व शासनाच्या अर्थसंकल्पात तरतूद या सर्व गोष्टींना वेळ लागतो व शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक होतात. पशुपक्ष्यांचे व जनावराचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होतात. म्हणून आत्ताच या योजना करतानाच लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून या सगळ्या गोष्टी केल्या तरच या दुष्काळी मंगळवेढ्यातील 24 गावांना फायदा होणार असल्याने या योजनेचा सर्व्हे करत असताना समाविष्ट असलेल्या 24 गावात ज्या ज्या ठिकाणी शासनाचे पाटबंधारे व लघु पाटबंधारे विभागाचे पाझर तलाव आहेत त्या सर्व गावांतील पाझर तलाव, साठवण तलाव, ओढे- नाले यांचा समावेश सर्व्हेत होणे आवश्‍यक आहे. असा सर्व्हे होणे गरजेचे आहे, कारण ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे विद्युत पंप चालू असले की पाणी येते, बंद झाले की पाणी बंद होते. पुढे पशुपक्ष्यांना सुद्धा एक थेंबभरही पाणी पिण्यासाठी राहील की नाही याची शाश्वती नसते.

शिवाय बऱ्याचदा पंपसंचाचा बिघाड असतो, नव्हे तर बिघाड वारंवार होतो. जेव्हा पाण्याची मागणी होते त्यावेळेस पंपसंचाच्या बिघाडाची कारणे पुढे येतात, असे कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्‍यात बंदिस्त जलवाहिन्या टाकलेल्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून ज्या ठिकाणी पाझर तलावात, साठवण तलावात, ओढे- नाले हे सर्व भरून घेतले तर पुढचे पाणी येईपर्यंत किंवा पंप दुरुस्त होईपर्यंत निदान पशुपक्ष्यांना, जनावरांना पिण्याला व आजूबाजूच्या भागाच्या क्षेत्राला थोडासा दिलासा मिळतो.

शिवाय दुष्काळी भागातील बहुतांश पाणी पुरवठ्याच्या योजना या जवळच्या साठवण तलावातील पाझर तलावातील ओढ्या- नाल्याच्या शेजारीच विहिरी खोदून या विहिरीद्वारे पाणीपुरवठ्याची साधने शासनाने गावोगावी निर्माण केल्याचे दिसते. त्यामुळे गावोगावच्या पाझर व साठवण तलावांचा समावेश सर्वेक्षणात झाल्यास त्या योजना निदान कार्यान्वित होतील. गावाला पाणीपुरवठा सुरळीत होईल. यासाठी गाव ओढे, नाले, पाझर तलाव, साठवण तलाव भरून देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याचाही सर्व्हे आत्ताच होणे गरजेचे आहे; अन्यथा पुढे या गोष्टी राहून जातात

लोकप्रतिनिधींनी याकडे वेळीच लक्ष घालणे जरुरीचे असून संबंधित जलसंपदा पाटबंधारे विभागाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला आत्ताच सतर्क करावे. तसे नियोजन करून प्रयोजन करून तशा पद्धतीने सर्व्हे करून घेणे आवश्‍यक आहे, तरच गावांतील जनतेचे, या भागाचे हित होईल. म्हणून लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालावे व जलसंपदा पाटबंधारे विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांचा पाठपुरावा करावा, अशी आग्रहाची मागणी दुष्काळी भागातील 24 गावातील शेतकरी वर्गातून होत आहे

सध्या मंगळवेढा तालुक्‍यात 24 गाव बंदिस्त जलवाहिनीद्वारे शेती पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण शासनामार्फत सुरू असून, या सर्वेक्षणात समाविष्ट 24 गावांतील पाझर तलाव, ओढे- नाले, साठवण तलाव यांचा समावेश झाल्याशिवाय या योजनेचा भविष्यात शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी सर्वेक्षण वेळीच योग्य ती खबरदारी घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.

- गणपत लवटे, शेतकरी, खुपसंगी, तालुका मंगळवेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT