Ram Satpute sakal
सोलापूर

Mohol News : सुशीलकुमार शिंदेनी सोलापूर साठी काय केले, एकही उद्योग आणला नाही, उलट मिल बंद पाडल्या

मोहोळ येथे, 'भाजपा कार्यकर्ता संवाद' मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी आमदार सातपुते बोलत होते.

राजकुमार शहा

मोहोळ - देशाचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री अशी विविध पदे भूषविली. मात्र सोलापूर साठी त्यांनी काय केले? एकही उद्योग आणला नाही उलट होत्या त्या मिल बंद पाडल्या, मराठा आरक्षणा विषयी मी सभागृहात आवाज उठवला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे. माजी खासदार शिंदे यांच्या मतदार संघातून भाजपला जादा मतदान होणार आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.

मोहोळ येथे, 'भाजपा कार्यकर्ता संवाद' मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी आमदार सातपुते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर म्हणाले, आमदार सातपुते यांच्या उमेदवारी मुळे तरुणांना ऊर्जा मिळाली आहे. सर्वांनी गट तट विसरून कामाला लागावयाचे आहे. देशाच्या विकासासाठी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावयाचे आहे.

जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे म्हणाले, मोदींनी वंचित घटकासाठी काम केले आहे. आमदार सातपुते यांच्या कडून खासदार झाल्यानंतर मोहोळ विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना काय केले? पात्रता नसणाऱ्यांनी पंतप्रधान मोदी वर टीका करू नये. त्यांची त्यांना जागा मतदार दाखवतील शेतकऱ्यांना फक्त वीज व पाणी द्या.

यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, शंकरराव पाटील, चिमण साठे, शंकर वाघमारे यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी राम जाधव, सोमेश क्षीरसागर, रमेश माने, राजन डोंगरे, अंकुश अवताडे,मुजीब मुजावर, दिलीप गायकवाड, ज्ञानेश्वर भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना बचुटे, वैशाली पवार, प्रकाश काळे, नागनाथ तळेकर, बाळासाहेब पाटील, जे के गुंड, आदी सह भाजपाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन गणेश झाडे यांनी केले, आभार महेश सोवनी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! AQI ४९१ वर, हवा बनली विषारी; श्वसन विकारांच्या रुग्णांत प्रचंड वाढ

Video : छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य कसं होतं? तो काळ डोळ्यापुढं आणणारा AI व्हिडिओ व्हायरल; सच्चे मराठे असाल तर नक्की पाहाल

Kolhapur Dentist End Life : पाठीवरील बॅगेत दगड-विटा भरून तलावात उडी; मित्रांना शेवटचा मेसेज, डॉक्टरचा धक्कादायक निर्णय, चिठ्ठी सापडली अन्...

Latest Marathi News Live Update: मेस्सी आज मुंबईत, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

१९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान; अमेरिकेतील स्टिंग ऑपरेशनमुळे राजकीय भूकंपाचा दावा

SCROLL FOR NEXT