Gadegaon 
सोलापूर

गादेगाव येथे ग्रामदैवताला दुधाचा अभिषेक घालून "या' संघटनेने केली आंदोलनाला सुरवात 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा, दूध पावडला 50 रुपये अनुदान द्यावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज (मंगळवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध आंदोलन पुकारण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल आणि उपाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत गादेगाव येथे ग्रामदैवत हनुमानाला दुधाचा अभिषेक करून आंदोनाला सुरवात करण्यात आली. 

आज तालुक्‍यातील उपरी, खेडभोसे, आंबे, चळे आदींसह तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे आज तालुक्‍यातील सुमारे चार लाखांहून अधिक लिटर दुधाचे संकलन बंद आहे. कोरोनामुळे दूध व्यवसाय संकटात आला आहे. त्यातच दुधाला दर मिळत नसल्याने दूध उत्पादक अधिकच आर्थिक अडचणीत आले आहेत. दुधाला 30 रुपये प्रतिलिटर दर मिळावा, अशी मागणी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानंतरही राज्य शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. सरकारचे दूध दराकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानीने आज आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार पंढरपूर तालुक्‍यात दूध आंदोलन करण्यात आले. 

गादेगाव येथे आज सकाळी ग्रामदैवत हनुमानाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरवात झाली. या वेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध दरवाढ मिळावी यासह राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. उपरी येथेही आज ग्रामदैवत हनुमानाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. खेडभाळणी येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Pune Nashik Railway Issue : पुणे–मंचर–नाशिक रेल्वे मार्ग रद्द, उत्तर पुणे जिल्ह्यात नाराजी

Water Scarcity : टंचाईमुळे नाशिक शहरात पाणीकपात; जून-जुलैमध्ये शनिवार बंद, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसांआड पुरवठा

Citroen Electric Car: ईव्ही क्षेत्रात सिट्रोएनचा मोठा दाव! जास्त फीचर्ससह परवडणारी E-C3X लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंम्मत

SCROLL FOR NEXT