मोहोळ(सोलापूर)ः पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पापरी (ता. मोहोळ) येथील स्वयंभू महादेव मंदिर कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यात दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर भाविकांची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवार (ता.21) पासून श्रावण महिना सुरू होत आहे. पापरी येथील स्वयंभू महादेव मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध असे देवालय आहे. श्रावणात या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी राज्यासह जिल्ह्यातुन भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
हेही वाचाः त्या शेतकरी पुत्राने शेतमजुुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केली चाळीस हजार रुपयांची मदत; वाचा सविस्तर
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील महादेवाची पिंड स्वयंभू आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा धुमाकुळ जोरदार सुरू आहे. यापूर्वी सभामंडपात जाऊन लांबुन दर्शन घेता येत होते. मात्र आता श्रावण महिन्यामूळे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता सभामंडप बंद करीत महादेवाचे दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला. महादेव मंदिरात शनिवारी (ता.18) या बाबत बैठक झाली. यावेळी ग्रामसेवक अनंत नकाते, उपसरपंच अजित भोसले, गाव कामगार तलाठी अचलारे, पोलीस पाटील प्रशांत पाटील, वारकरी संप्रदायातील संत मंडळी यांच्यासह अन्य गावकरी बैठकीत उपस्थित होते. त्या बैठकीत मंदिर बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढते आहे. त्यासाठी प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस ठाण्याला आवश्यक बंदोबस्तासाठी पत्र दिल्याचेही ग्रामसेवक अनंत नकाते यांनी सांगितले.
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.