walse patil photo 
सोलापूर

चर्चा तर होणारच.... वळसे-पाटील यांच्या एन्ट्रीची 

प्रमोद बोडके

सोलापूर : विधानसभेतील अनेक आमदारांना पद्धतशीरपणे हाताळणारे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची राज्याच्या राजकारणात शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळख आहे. सलग सातव्यांदा आमदार झालेले वळसे-पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आली आहे. राजकारणात आणि समाजकारणात संवेदनशील व अग्रभागी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या वळसे-पाटील यांच्या एन्ट्रीची चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासनात सध्या पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यपद्धतीची कुजबूज सुरू आहे. 
हेही वाचा - मुझे एकदिन ओ कमरेमे ले गये और... 
शिस्तीचे आणि अभ्यासू मंत्री सोलापूरचे पालकमंत्री झाल्याने प्रशासनातील अधिकारी अलर्ट झाले आहे. प्रशासनाच्या बैठकांना कार्यकर्त्यांनी फिरकू नये असा नियमच पालकमंत्री वळसे-पाटील यांनी केल्याने राजकारणी धास्तावले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासनात सध्या पालकमंत्री वळसे-पाटील यांची कार्यपद्धती चर्चेचा विषय होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून वळसे-पाटील यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. तब्बल सातव्यांदा विधानसभेत आंबेगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वळसे-पाटील यांनी विधानसभा अध्यक्षासह विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केल्याने समोरच्याचा अंदाज आणि अभ्यास त्यांना क्षणात येत असल्याची प्रचिती अधिकाऱ्यांना येऊ लागली आहे. 
हेही वाचा - म्हशीच्या गोठ्याला बंगल्याचे रूप! 
विचारलेल्या प्रश्‍नांना सोडून तिसरीच माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना आजच्या आढावा बैठकीत शिस्त आणि मुद्दा याचा अनुभव आला आहे. वेळेवर उपस्थितीत आणि अपडेट माहिती याची तयारी आता अधिकारी व कर्मचारी करू लागले आहेत. पालकमंत्र्यांच्या प्रशासकीय बैठकीला त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हमखास हजर राहून मी किती जवळचा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. तसा प्रयत्न मात्र पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या बैठकांच्या बाबतीत होताना दिसत नाही. प्रशासकीय बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते येत नसल्याने कार्यकर्त्यांनाही यातून नवीन शिकायला मिळू लागले आहे. 
पुढच्या दौऱ्यात पक्षीय बैठका 
पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोलापूरच्या दुसऱ्या दौऱ्यात वळसे-पाटील यांनी जिल्ह्याच्या प्रशासनाची आज तब्बल पाच तास बैठक घेतली. सोलापूरच्या विकासासोबतच आपण पक्ष संघटनेलाही महत्त्व देणार असल्याचे वळसे-पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी दौऱ्यात पक्ष संघटनेच्या बैठका व सुधारणा यावर भर दिला जाण्याची शक्‍यता असून तसे संकेतही त्यांनी आजच्या दौऱ्यात दिले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT