teacher will provide essantials to seniour citizens 
सोलापूर

घरात अडकलेल्या वयोवृद्धांना गुरूजी देणार जीवनावश्‍यक वस्तू 

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर)ः कोरोना लॉकडाऊन मुळे घरातच अडकलेल्या वयोवृध्द व विकलांगाना आता आश्रमशाळेचे मुख्याध्यापक धान्य व जिवनावश्‍यक वस्तू घरपोच देणार आहेत. वयोवृध्दांना एकाच कॉलवर मुख्याध्यापक सर्व वस्तु घरपोच आणून देणार आहेत. 
मागील काही दिवसापासून कोरोना मुळे लॉकडाऊन लोकांना भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तू कमी प्रमाणात मिळत आहेत. काही कालावधीसाठी ही दूकाने सुरु ठेवून वस्तुचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये घरात एकाकी असलेले वृध्द, विकलांग यांचे तर लॉकडाऊनमुळे अत्यंत हाल झाले आहेत. त्यांच्या कुटूुंबात कुणी नसल्याने त्यांना दुकानपर्यंत पोचून या वस्तु मिळवणे अवघड होते. त्यामुळे या लोकांची उपासमार होण्याची शक्‍यता दिसू लागली आहे. काही ठीकाणी शेजारीपाजारी मदत करतात. पण सातत्याने मदत मिळत नाही. तेव्हा या लोकांना निदान भोजनापुरते धान्य, पीठ, तेल, मीठ, भाजी आदी वस्तुची मोठी गरज भासु लागली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या असहाय अवस्थेत असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांना मदत देण्यासाठी काहीनाकाही सोय करणे आवश्‍यक होते. 
हेही वाचाः लॉकडाऊनच्या काळात जुगाराने धरला जोर 
तेव्हा या कामासाटी आता आश्रमशाळा मुख्याध्यापकांना कामाला लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुख्याध्यापकांनी लॉकडाऊनमुळे आश्रमशाळा केव्हाच बंद केल्या आहेत. हे मुख्याध्यापक सध्या घरीच आहेत. महसुल व पोलिस यंत्रणा परप्रांतीयांची नोंदणी, संशयीत रुग्णांचा शोध, आरोग्य खात्याची यंत्रणा सक्रीय करणे आदी अनेक कामात गुंतले आहेत. 
हेही वाचासंचारबंदीच्या काळात मिले सुर मेरा तुम्हारा 
कोरोनामुळे शाळेला सुट्टी दिल्यामुळे शिक्षण खात्यातील आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना देखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मदतीला घेण्यात आले आहे. सध्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी शासनाने सवलत देण्यात आली आहे. हे सदरच्या जीवनावश्‍यक वस्तू असलेल्या भाजीपाला व किराणा बाजार खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. जिल्ह्यातील एकूूण 75 आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांची नियुक्ती या का्मासाठी केली. 
ही नियुक्ती मंगळवेढा,अक्कलकोट , सोलापूर महानगरपालिका, उत्तर सोलापूर ,दक्षिण सोलापूर पंढरपूर ,सांगोला, मोहोळ, माळशिरस, बार्शी ,करमाळा तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागात करण्यात आली आहे. वयोवृद्ध विकलांग व्यक्तीने जीवनावश्‍यक साहित्याची मागणी मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर केल्यास त्यांना सदरचे साहित्य घरपोच करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. .  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT