teacher. 
सोलापूर

कोरोना ड्यूटी रद्दसाठी वशिलेबाजी; खासगी, प्राथमिक, माध्यमिक, महापालिका शिक्षकांना ड्यूटी बंधनकारक 

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका हद्दीतील खासगी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षकांसह महापालिकेच्या शिक्षकांना 30 दिवस कोरोना ड्यूटी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील नियुक्‍त 597 पैकी 309 शिक्षकांनी कालावधी पूर्ण केला असून, त्यांच्या ठिकाणी आता नव्या शिक्षकांची नेमणूक करण्याचा आदेश महापालिकेने नुकताच काढला. मात्र, ड्यूटी रद्द करून घेण्यासाठी बहुतांश शिक्षकांनी पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वशिलेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे ड्यूटी रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी कोण काम करणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील सर्वेक्षण, कोमॉर्बिड रुग्णांचे सर्वेक्षण, कोविड कंट्रोल रूम, कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग, जिल्हा बंदीअंतर्गत नाक्‍यांवर वाहनांची नोंद ठेवणे, क्‍वारंटाइन सेंटरमधील कामांसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागासह महापालिकेच्या शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली जात आहे. दरम्यान, राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे, आमदार दत्तात्रय सावंत यांच्या निवेदनानुसार महापालिकेने 30 दिवसांची ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्‍त करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती तयार केली आहे. त्यानुसार 30 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकांनी नव्याने नियुक्‍त शिक्षकांना प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. तत्पूर्वी, महापालिकेने पहिल्या टप्प्यात नियुक्‍त केलेल्या सुमारे 60 शिक्षकांनी आयुक्‍तांच्या नोटिशीनंतरही उत्तर दिलेले नाही. तर 247 शिक्षकांपैकी काहींनी निम्मेच काम केल्याचेही महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यांच्या नावाची यादी वेतन अधीक्षकांना पाठविली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. 

वेतन थांबविण्याबाबत अधीक्षकांचे पत्र 
शहर हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व महापालिका शाळांमधील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपपर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रित द्यावी, असे पत्र वेतन अधीक्षकांनी सर्व शाळांना पाठविले. जून महिन्यातील पगार घेतलेल्या सर्वांच्या नावांचा त्यात समावेश असावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. जे मुख्याध्यापक अपूर्ण माहिती देतील, त्यांचे पगारबिल थांबविले जाईल, असा इशाराही वेतन अधीक्षकांनी दिला. त्यानुसार महापालिका आता शहर हद्दीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्याने 30 दिवसांची कोरोना ड्यूटी देणार आहे. 

याबाबत महापालिकेचे उपायुक्त पंकज जावळे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांनी शिक्षकांची ड्यूटी रद्द करण्याची विनंती मागणी केली. नियुक्‍त शिक्षकांपैकी 30 टक्‍के शिक्षकांनी स्वत:हून ड्यूटी रद्दसाठी अर्ज केले. मात्र, खरोखर अडचण असलेल्यांशिवाय कोणाचीही ड्यूटी रद्द केली जाणार नसून सर्वांना काम करणे बंधनकारक असेल. 

शहर हद्दीतील शिक्षकांची स्थिती 

  • खासगी प्राथमिक शिक्षक : 1,694 
  • माध्यमिक शिक्षक : 1,927 
  • महापालिकेचे शिक्षक : 183 
  • कोरोना ड्यूटी केलेले शिक्षक : 309 
  • ड्यूटी नको म्हणणारे शिक्षक : 590 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT