Strike 
सोलापूर

दहा जुलैची अधिसूचना करा रद्द, अन्यथा 10 ऑगस्टपासून आंदोलन; कोणी दिला इशारा? वाचा 

संतोष सिरसट

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने 10 जुलैला एक अधिसूचना काढून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचा अधिकार काढून घेणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे. ही अधिसूचना 9 ऑगस्टपर्यंत रद्द करावी; अन्यथा 10 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे. 

सरकारने या अधिसूचनेवर हरकती मागविल्या आहेत. शालेय शिक्षण विभागात पेन्शन कायमस्वरूपी नाकारली जाणार आहे. पण, शासनाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पेन्शन काढून घेता येणार नाही. अशी सुधारणा पूर्वलक्षी प्रभावाने करता येणार नाही. यावर पावसाळी अधिवेशनात अभ्यास समिती नेमली असताना त्यावर अधिकाऱ्यांनी निर्णय घेणे म्हणजे शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाइन सभेत निषेध व्यक्त करून तीन टप्प्यांत आंदोलन करण्याचे ठरले होते. पहिल्या टप्प्यात राज्यभरात हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून 20 जुलैपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात आमदार ना. गो. गाणार यांनी 18 जुलैला हक्कभंगाची नोटीस दिली आहे. 22 ते 24 जुलै दरम्यान राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात अधिसूचना रद्द करण्यासाठी तालुका / जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

22 जुलैला राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस आमदार गाणार यांनी दिली आहे. परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर यांच्यासह राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व आमदार गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबासाहेब काळे, सुनील पंडित, पुणे विभागात जितेंद्र पवार, मराठवाडा विभागात किरण बावठणकर, सुरेश पठाडे, अमरावती विभागात राजकुमार बोनकिले, मुंबई विभागात माजी आमदार संजीवनी रायकर, उल्हास वडोदकर, नागपूर विभागात योगेश बन, पूजा चौधरी हे नेतृत्व करतील. सरकारने 9 ऑगस्टपर्यंत अधिसूचना रद्द करावी, अन्यथा 10 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे कार्यवाह सोमनाथ राठोड व कार्याध्यक्ष जितेंद्र पवार यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT