Teachers Fund Canva
सोलापूर

माढा तालुक्‍यातील गुरुजन धावले मदतीला ! जमा केला दहा लाखांचा निधी

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी माढा तालुक्‍यातील शिक्षकांनी दहा लाखांचा निधी जमा केला

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक (ZP Teachers) कोरोनाच्या (Covid-19) काळामध्ये मदतीला धावून आले आहेत. गुरुजनांनी दहा लाखांचा निधी जमा केला असून कोरोनावरील उपाययोजनांसाठी हा निधी दिला जाणार आहे. (Teachers in Madha taluka raised Rs 10 lakh for corona measures)

माढा तालुक्‍यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची संख्या जवळपास 950 इतकी आहे. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी तालुक्‍यातील सर्व शिक्षकांनी ठोस निधी उभा करण्याची संकल्पना मांडली. याला तालुक्‍यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी साथ देत आतापर्यंत सुमारे साडेनऊ लाखांचा निधी जमा झाला असून येत्या काही दिवसांत उर्वरित पन्नास हजारांचा निधी जमा होऊन एकूण दहा लाखांचा निधी हा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे.

याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांची व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन मीटिंगही झाली आहे. शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे केलेला हात निश्‍चितच कौतुकास्पद आहे. तालुक्‍यातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाबरोबरच कोरोनाच्या काळामध्ये कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व कोरोनासंबंधी प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडत आहेत.

शिक्षकांनी आता सामाजिक बांधिलकी दाखवत जवळपास दहा लाखांचा निधी कोरोनासंबंधी करावयाच्या उपाययोजनांसाठी माढा तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून कोरोनाबाबत आरोग्य विभागाला उपयुक्त साधनसामग्री, औषधे व इतर गोष्टी पंचायत समितीचे अधिकारी व शिक्षक प्रतिनिधी विचारविनिमय करून घेणार आहेत. येत्या काही दिवसांतच दहा लाखांचा निधी आरोग्य विभागाकडे दिला जाणार आहे. माढा तालुक्‍यातील शिक्षकांनी घालून दिलेल्या आदर्श उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT