online teaching.jpg 
सोलापूर

सर्वात मोठी बातमी ! पहिल्या सेमिस्टरपर्यंत ऑनलाइन टिचिंग 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे आगामी शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडणार हे निश्‍चित झाले असून 2020-21 च्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन आतापासूनच सुरु झाले आहे. पहिले सेमिस्टर होईपर्यंत प्राध्यापकांनी ऑनलाइन टिचिंगची तयारी ठेवावी अन्‌ विद्यापीठांनी तशाप्रकारे सुविधा उपलब्ध करावी, असे राज्यपाल नियुक्‍त समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्ट्याही कमी केल्या जाणार आहेत. 

विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि एसएनडीटी विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती नियुक्‍ती केली. तर परीक्षा कशाप्रकारे घ्यायची, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वतंत्र समिती नियुक्‍त केली आहे. तरीही राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील 50 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय अद्यापही झालेला नसून सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल. तत्पूर्वी, आगामी शैक्षणिक वर्ष महिन्याहून अधिक काळ लांबणीवर पडणार नाही, याची दक्षताही शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे प्राध्यापकांना साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन टिचिंग करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सोलापूर, पुण्यासह अन्य विद्यापीठांमध्ये नियोजन सुरु झाले आहे. पहिल्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या 25 दिवसांच्या दिवाळी सुट्ट्या कमी करुन पाच ते आठ दिवसच दिल्या जाणार आहेत. 

ऑनलाइन प्रवेशासाठी महाविद्यालयांचे विद्यापीठांकडे बोट 


राज्यातील विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात 15 जूनऐवजी आता जुलैपासून होईल, असे गृहीत धरुन विद्यापीठांनी तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार असल्याने आगामी शैक्षणिक वर्षातील संपूर्ण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने करावी लागणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. श्रेणिक शहा यांनी व्यक्‍त केली. मात्र, राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांपैकी 30 टक्‍के महाविद्यालयांनी नकार देत विद्यापीठांकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रियेचा नवा पेच निर्माण झाला आहे. 

ऑनलाइन टिचिंगची तयारी ठेवावी लागेल 
राज्यातील 50 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत चार ऍक्‍शन प्लॅन तयार केले असून राज्यपाल नियुक्‍त समिती दोन दिवसांत उच्च शिक्षण विभागाला अहवाल सादर करेल. राज्यातील सद्यस्थिती पाहता आगामी सेमिस्टर होईपर्यंत प्राध्यापकांना ऑनलाइन टिचिंगची तयारी ठेवावी लागेल. 
- डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बस एकमेकांना धडकली...

Mumbai Local Violence: मुंबई लोकलमध्ये १२ तासांत चार हिंसक घटना; प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

ममतांना आणखी एक धक्का, ३ महिन्यापूर्वी राज्यसभेवर पाठवलेल्या खासदार कोयल यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT