Cows 
सोलापूर

धक्कादायक..! लॉकडाउन असतानाही कत्तलीसाठी गायींना घेऊन निघालेल्या टेम्पोने केले दोन जिल्हे पार; अखेर "येथे' रंगेहाथ सापडलाच 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : दोन जिल्हे पार करत बारामतीवरून उस्मानाबादला कत्तलीसाठी घेऊन निघालेला जनावरांचा टेम्पो वैराग येथे पोलिसांनी पकडला. यामुळे पंधरा जर्सी गायींना जीवदान मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असून टेम्पोने दोन जिल्हे पार केले. तिसऱ्या जिल्ह्यातून जाताना मात्र रंगेहाथ सापडला. जनावरांची कत्तल बंद असतानाही टेम्पोतून बेकायदेशीररीत्या व गायींना निर्दयतेने बांधून वाहतूक करताना हा टेम्पो पोलिसांनी अडवून सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी आसू (ता. फलटण, जि. सातारा) येथील एकाविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

ही घटना बुधवारी रात्री सव्वादहाच्या दरम्यान घडली. याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कत्तलीसाठी 15 जर्सी गायी भरून बारामतीवरून टेम्पो (13 एएक्‍स- 2403) निघाला होता. कत्तलीला बंदी असताना कत्तल करण्याच्या इराद्याने बारामती ते उस्मानाबाद येथे नेण्यासाठी गायींना टेम्पोमध्ये दोरीने निर्दयतेने, निष्क्रियतेने व क्रूरतेने बांधून त्यांची बेकायदा वाहतूक करताना हिंगणी रोड, दत्त मंदिराजवळ, लाडोळे रोडजवळ, वैराग येथे पोलिसांनी पकडला. त्यात पंधरा जर्सी गायींना जीवदान मिळाले. मात्र टेम्पोत निर्दयतेने बांधल्याने प्रवासात खरचटल्याने गायींना गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी बार्शी येथील अलीपूर रोडवर श्री नवकार तीर्थ गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे. मात्र प्रवासात आठ जर्सी गायी मरण पावल्या असून, सात गायी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

लॉकडाउन असतानाही जनावरांची बेकायदा बारामती ते उस्मानाबाद अशी वाहतूक कशी काय झाली? पुणे व सोलापूर हे दोन्ही जिल्हे लॉकडाउन असून हा टेम्पो वैरागपर्यंत पोचलाच कसा, असा प्रश्न प्राणीमित्रांतून विचारला जात आहे. गो-हत्याबंदी असूनही त्या गायींना जीवदान देणारे पोलिस, मानद पशू कल्याण अधिकारी धन्यकुमार पटवा यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT