दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी लसीकरण? कोवॅक्‍सिन लस टोचण्याची शक्‍यता Sakal
सोलापूर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी लसीकरण?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी लसीकरण? कोवॅक्‍सिन लस टोचण्याची शक्‍यता

तात्या लांडगे

जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यां 10 जानेवारीनंतर कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जाणार आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची (Students) संख्या जिल्हा प्रशासनाने निश्‍चित केली असून, त्यांना 10 जानेवारीनंतर कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना लस टोचण्याचे नियोजन केले जात आहे. राज्यातील 15 लाख 27 हजार 761 दहावीच्या विद्यार्थ्यांनी तर 29 लाख 54 हजार 741 विद्यार्थ्यांनी बारावीसाठी परीक्षेचा अर्ज केला आहे. त्यांना लस टोचली जाणार आहे. दुसरीकडे, 16 जानेवारीनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर लस (Booster Dose) देण्यात येणार आहे. (Tenth and twelfth grade students will be vaccinated against corona before the exam)

सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) 18 वर्षांवरील 34 लाख 14 हजार 400 व्यक्‍तींना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निश्‍चित केले आहे. त्यात शहरातील सात लाख 34 हजार 383 व्यक्‍तींचा समावेश आहे. शहर व ग्रामीणमधील तब्बल सहा लाखांपर्यंत तरुणांनी अजूनपर्यंत प्रतिबंधित लसीचा एकही डोस टोचलेला नाही. दरम्यान, कोरोनाच्या (Covid-19) संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी 15 ते 18 वयोगटातील तरुणांना लस टोचण्यासंदर्भात केंद्र सरकारने शनिवारी (ता. 25) भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार त्यांच्या लसीकरणाचे नियोजन युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांना तर दुसऱ्या लाटेत 18 वर्षांवरील तरुणांना सर्वाधिक बाधा झाली. आता तिसऱ्या लाटेत 15 ते 18 वयोगटातील तरुणांना धोका होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात असल्याने त्यांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असल्याचेही बोलले जात आहे.

तालुकानिहाय तरुण (15 ते 18 वयोगट)

  • अक्‍कलकोट : 18,661

  • बार्शी : 22110

  • करमाळा : 14,883

  • माढा : 19,222

  • मोहोळ : 16,486

  • माळशिरस : 28,805

  • मंगळवेढा : 12,216

  • उत्तर सोलापूर : 6,276

  • पंढरपूर : 26,242

  • सांगोला : 19,156

  • दक्षिण सोलापूर : 14,362

  • सोलापूर शहर : 54,377

'त्या' मुलांना कोवॅक्‍सिनचा डोस

केंद्र सरकारच्या (Central Government) परवानगीनंतर आता राज्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांनाही कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जाणार आहे. कोविशिल्ड लस (Covishield Vaccine) टोचल्यानंतर दुसऱ्या डोससाठी 84 दिवस थांबावे लागणार आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात असल्याने त्या मुलांचे वेळेत दोन डोस व्हावेत या हेतूने त्यांना कोवॅक्‍सिन लस (Covaxin) टोचली जाण्याची शक्‍यता आहे. लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे (Dr. Aniruddha Pimpale) यांनीही त्याला दुजोरा दिला असून, केंद्र सरकारच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनंतर त्याचे नियोजन होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT