सोलापूर

Solapur Crime: शेतीच्या वादातून सोलापुरात भीषण कांड; चुलत्याचं शीर हातात घेऊन बाईकवरुन फिरत होता तरुण

संतोष पाटील

टेंभुर्णी : शेतीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्याची हत्या करत तसेच त्याचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन बाईकवरुन गावात फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी चारपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आज याला माढा पोलिसांत हजर करण्यात आलं, तर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Terrible scandal Solapur due to agricultural dispute young man beheaded his uncle)

आरोपी पोलीस ठाण्यात हजर

या हत्याकांडातील आरोपी शिवाजी जाधव हा स्वतः मंगळवारी अकलुज पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलीसांनी रात्री अटक केली. यातील हत्या करण्यात आलेली व्यक्ती शंकर जाधव (वय 65, रा. कुरणवस्ती शेवरे, ता.माढा, जि. सोलापूर ) यांचं धडावेगळं केलेले शीर सोमवारी सायंकाळी पोलिसांना आढळून आलं, त्यानंतर मंगळवारी शवविच्छेदन होऊन दुपारी शेवरे इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Latest Marathi News)

या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मृत शंकर जाधव यांचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (रा. शेवरे ता.माढा) यानं फिर्याद दिली होती. यात शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव (रा. कुरणवस्ती शेवरे ता.माढा) यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

शंकर प्रल्हाद जाधव आणि आरोपींमध्ये शेतीच्या कारणावरुन सतत वाद होत होते. दोन वर्षापूर्वी यासंदर्भात माढा न्यायालयात याप्रकरणी दावा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी शंकर उर्फ बिटू प्रल्हाद जाधव यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानं ते घरामध्ये झोपले होते.

यावेळी शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, अजित जाधव, आकाश जाधव हे त्यांच्या घरी आले. यावेळी शंकर जाधव यांना परमेश्वर जाधव, अजित जाधव व आकाश जाधव यांनी पकडलं आणि शिवाजी जाधव यानं त्याच्या हातातील कुऱ्हाडीनं शंकर जाधव यांच्यावर वार केले. तसेच आपल्या सख्या चुलत्याचं शीर धडावेगळं करुन ते बरोबर घेऊन तो बाईकवरुन गावातून फिरत होता, इतर इतर सर्व आरोपी फरार झाले. (Marathi Tajya Batmya)

धडावेगळं झालेलं शीर पोलिसांनी केलं जप्त

या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टेंभुर्णी आणि अकलुज पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांचे संयुक्त पथकं तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.

तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची आरोपींना शोधण्यासाठी मदत घेण्यात आली. दरम्यान, सायंकाळी शंकर जाधव यांचं धडावेगळं केलेलं शीर आणि आरोपीनं वापरलेली मोटारसायकल महाळुंग इथल्या शेतात आढळून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT