rayat baag.jpg 
सोलापूर

विद्यार्थी व प्राध्यापकांच्या श्रमदानातून 'रयत' च्या अंगणात बहरले नंदनवन

किरण चव्हाण

माढा(सोलापूर): माढयातील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील रयत सेवकांनी 18 लाख रुपयांचा खर्च स्वत:च्या पगारातून करत महाविद्यालयातील शेती विभागाला तसेच महाविद्यालयासाठी साडेसात हजार चौरस फूटाच्या इमारतीच्या बांधकामाला चालना दिली.

महाविद्यालये बंद असली तर प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी. सी. मधील विद्यार्थी, कर्मचारी यांनी शेतात व्‌ बांधकामावर स्वत: काम काम करत महाविद्यालयाची शेती, बाग फुलवली. इमारत बांधकामाचाही शुभारंभ केला आहे. कमवा व्‌ शिका हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्‍य या निमित्ताने आचरणात आणत शेती विभागातून महाविद्यालयास आर्थिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. श्रमदानातून प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या विकासाच्या संधी अनलॉक केल्या आहेत. 

1970 साली सुरू झालेले माढयातील हे महाविद्यालयच मुळी देणगीदात्यांच्या मदतीने व ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी यांच्या श्नमातून उभे राहिले. पन्नास वर्षांनंतर पुन्हा त्याच पद्धतीने महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. सहकारमहर्षी गणपतराव साठे, उद्योगपती जयकुमार पाटील, भाई एस.एम. पाटील, नामदेवराव जगदाळे, वसंतराव साठे, जनार्दनअप्पा चव्हाण, नागनाय कदम, योगीराज कुर्डे यांच्या व इतर अनेकांच्या पुढाकारातून व देणगीतून महाविद्यालय उभा राहिले. 

माढा शहरातील मूळ इमारतीशिवाय सोलापूर रस्त्याकडील सोळा एकर परिसरात महिला वसतिगृह व जिमखाना इमारत आहे. याच ठिकाणी वर्गखोल्यांसाठी साडेसात हजार चौरसमीटरचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या भौतिक व गुणात्मक विकासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने रयत सेवकांनी कंबर्‌ कसली. रयत सेवकांच्या दुष्काळ निधीमधून सुमारे 70 लाख लिटर क्षमतेचे शेततळे निर्माण केले. 
तीन लाख रूपयांचे तार कंपाऊंड केले. मुरूमाचे अंतर्गत रस्ते तयार केले. जमीनीचे सपाटीकरण केले. सुशोभिकरणासाठी फुलझाडे लावली. आंब्याची बाग, गोल्डन सिताफळ, दोडके, कारले यांचे उत्पादन महाविद्यालय घेत आहे. शेततळ्यात दहा हजार मत्सबीज सोडले आहेत. महाविद्यालय बंद असले तरी ऑनलाईन शिक्षणासोबत प्राचार्य, प्राध्यपक, कर्मचाऱ्यांचे हात शेतात राबत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा महाविद्यालय जपत आहे. माढा नगरपंचायतीच्या माध्यमातून मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र टॉयलेट ब्लॉक बांधले आहेत. 
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी युजीसीचे मंजूर झालेले कोर्सेस पुढील शैक्षणिक वर्षामध्ये चालू करीत आहोत. बी. एस्सीचे वर्ग व रयत इंग्लिश मिडियम स्कूल चालू करण्याचा मानस आहे. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, सांस्कृतिक भवन, विद्यार्थी कौशल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, चारशे मीटर रनिंग ट्रॅक तयार करणे, इनडोअर स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, विद्यार्थी अभ्यासिका, पार्किंग व्यवस्था, विद्यार्थी व सेवक यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांसारख्या भौतिक सुविधा उभा करण्यासाठी महाविद्यालय सध्या नागरिकांना मदतीचे आवाहन करत आहे असे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT