Students
Students Esakal
सोलापूर

महाविद्यालय स्तरावरच प्रवेश! प्रथम वर्षाची द्वितीय सत्र परीक्षा ऑनलाइनच

तात्या लांडगे

बारावीनंतर वाणिज्य, विज्ञान व कला शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश देणे सर्वच महाविद्यालयांना बंधनकारक आहे.

सोलापूर : बारावीच्या निकालाची टक्‍केवारी यंदा वाढली आहे. दरवर्षी सरासरी 95 ते 96 टक्‍क्‍यांपर्यंत बारावीचा निकाल (Twelfth exam result) असतो. परंतु, यंदा 99 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. बारावीनंतर वाणिज्य (Commerce), विज्ञान (Science) व कला (Arts) शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश देणे सर्वच महाविद्यालयांना बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया (Process for the first year of graduation) महाविद्यालय स्तरावरच राबविण्याचा निर्णय विद्यापीठांनी (University) घेतला आहे.

बारावीनंतर वाणिज्य, विज्ञान व कला शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश देणे सर्वच महाविद्यालयांना बंधनकारक आहे. जागांची मर्यादा सांगून महाविद्यालयांनी प्रवेश नाकारू नये, असे निर्देश पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) दिले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास विद्यापीठाकडून प्रवेश क्षमतेत 20 टक्‍के वाढ केली जाणार आहे. तसेच आवश्‍यकता असल्यास वाढीव तुकडीलाही तत्काळ मान्यता दिली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर 20 ऑगस्टनंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असेही सांगण्यात आले. विद्यार्थ्यांचे गुण व जातनिहाय आरक्षणाची टक्‍केवारी पाहून सर्वांनाच प्रवेश मिळणार आहे. कोरोनामुळे विद्यापीठस्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्‍य नसल्याने आता महाविद्यालयांकडून सर्व विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळेल, असा विश्‍वास परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विकास कदम यांनी व्यक्‍त केला. 1 सप्टेंबरपासून नव्या शैक्षणिक वर्षास सुरवात होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या वर्षाची द्वितीय सत्र परीक्षा ऑनलाइनच

कोरोनामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्‍य असल्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र परीक्षा 9 ते 21 ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 26 हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे प्रॉक्‍टरिंग करणे अशक्‍य असल्याने संशयित विद्यार्थ्यांचीच या प्रणालीद्वारे पडताळणी केली जाणार आहे.

प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे 20 ऑगस्टनंतर सुरू होईल. बारावीच्या निकालाची टक्‍केवारी वाढल्याने सर्वच विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावरून मेरिट व आरक्षणानुसार प्रवेश मिळतील.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

Video: मोदींची मिमिक्री करणाऱ्या श्याम रंगिलाला उमेदवारी अर्जच मिळेना! वाराणसीमधून लढण्यासाठी सज्ज

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

SCROLL FOR NEXT