जिल्ह्यात मुलींचा वाढला जन्मदर ! Canva
सोलापूर

जिल्ह्यात मुलींचा वाढला जन्मदर! जाणून घ्या कोणत्या तालुक्‍यात किती मुली

जिल्ह्यात मुलींचा वाढला जन्मदर ! जाणून घ्या, कोणत्या तालुक्‍यात किती मुली

तात्या लांडगे

सांगोल्यातील कोळा परिसरात एक हजार मुलांमागे सर्वाधिक 961 मुलींचे प्रमाण आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) करमाळा (karmala), कुर्डुवाडी (Kurduwadi), टेंभुर्णी (Tembhurni), बार्शी (Barshi), माढा (Madha), अकलूज (Akluj) आणि पंढरपूर (Pandharpur) भाग - दोन या भागात मुलींच्या जन्माचा टक्‍का अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तरीही, दिलासादायक बाब म्हणजे "मुलगा हाच वंशाचा दिवा' ही मानसिकता आता बदलत आहे. सांगोल्यातील (Sangola) कोळा परिसरात एक हजार मुलांमागे सर्वाधिक 961 मुलींचे प्रमाण आहे. तर अक्‍कलकोट (Akkalkot) तालुक्‍यात दरहजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण 957 झाले आहे.

सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मुली आता मुलांबरोबर काम करताना पाहायला मिळतात. आठ- दहा वर्षांपूर्वीची मानसिकता आता बऱ्याच प्रमाणात बदलली आहे. एक- दोन मुलींनंतर मुलगा व्हावा म्हणून अक्‍कलकोट, मंगळवेढा या तालुक्‍यांच्या सीमावर्ती भागातील दवाखान्यातून अवैधरीत्या गर्भपात करण्याचे प्रकार अनेकदा उघड झाले. परंतु, कोरोना काळात मार्च 2020 पासून आजपर्यंत प्रवास आणि विनाकारण फिरण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे अवैध गर्भपात झालेच नाहीत. त्यामुळे मुलींच्या जन्माचा टक्‍का वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, पालकांचे विचारही आता प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले. मुलींना नोकरी, राजकारणात स्वतंत्र आरक्षण असल्याने तिच्या प्रगतीचे द्वार खुले झाले आहे. अनेक मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुलगा- मुलगी हा भेदभाव आता कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या समन्वयातून मुलींचे प्रमाण एक हजार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण

  • विभाग (तालुका) : मुलींची संख्या

  • कोळा : 961

  • अक्‍कलकोट : 957

  • उत्तर सोलापूर : 948

  • वैराग : 946

  • मंगळवेढा : 918

  • दक्षिण सोलापूर : 916

  • माळशिरस : 911

  • मोहोळ : 909

  • पंढरपूर भाग-एक : 911

  • सांगोला : 907

  • अकलूज : 893

  • पंढरपूर भाग-दोन : 885

  • माढा : 878

  • कुर्डुवाडी, टेंभुर्णी : 873

  • करमाळा : 866

  • बार्शी : 864

प्रांताधिकाऱ्यांचा सोनोग्राफी सेंटरवरच वॉच

अक्‍कलकोट व मंगळवेढ्याच्या सीमेवरून कर्नाटकात जाऊन अवैधरीत्या गर्भपात करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र, कोरोना काळातील कडक निर्बंधांमुळे परराज्यात जाऊन गर्भलिंग निदान चाचणी अथवा गर्भपात थांबले आहेत. त्यामुळे एप्रिल ते जुलै 2021 या काळात जिल्हाभरात पाच हजार 514 मुले तर पाच हजार 301 मुलींचा जन्म झाला. "बेटी बचाओ बेटी पढाओ' आणि जननी सुरक्षा योजना, बेबी केअर किट, यशस्वी मुलींचा सन्मान अशा विविध उपक्रम आणि योजनांमुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्माचा टक्‍का वाढला आहे. परंतु, ज्या तालुक्‍यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापून त्या तालुक्‍यातील प्रत्येक सोनोग्राफी सेंटरवर वॉच ठेवला जाणार आहे.

सीमावर्ती भागात होणाऱ्या गर्भपाताला कोरोना काळातील निर्बंधांमुळे आळा बसला. दुसरीकडे, पालकांची मानसिकताही बदलत असून मुलगा- मुलगी असा भेदभाव कमी झाल्याने मुलींच्या जन्माचा टक्‍का वाढू लागला आहे.

- जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT