english paper  esakal
सोलापूर

इंग्रजीचा पहिला पेपर कॉपीमुक्‍त! जिल्ह्यातील 927 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर

बहुतेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या या पेपरला एकाही विद्यार्थ्याने कॉपी केली नसल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. 54 हजार 216 विद्यार्थ्यांपैकी 927 विद्यार्थी या पेपरसाठी गैरहजर राहिल्याचेही सांगितले.

तात्या लांडगे

सोलापूर : बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली असून शुक्रवारी पहिला पेपर झाला. कला, वाणिज्य शाखेसह विज्ञान शाखेतील बहुतेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या या पेपरला एकाही विद्यार्थ्याने कॉपी केली नसल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. 54 हजार 216 विद्यार्थ्यांपैकी 927 विद्यार्थी या पेपरसाठी गैरहजर राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 358 केंद्रांवर बारावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. 4) सुरु झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे शहरातील काही मुलांना परीक्षेला जाण्यासाठी थोडासा विलंब झाला. परंतु, बोर्डाने यंदा अर्धा तास वेळ वाढवून दिल्याने त्यांना अडचण आली नाही. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी टेंभूर्णीसह त्या परिसरातील काही शाळांना भेटी दिल्या. यंदा परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर सहा फिरते पथक तयार करण्यात आले आहेत. पहिल्या पेपरला एकाही विद्यार्थ्याने कॉपी करून उत्तरे लिहली, अशी नोंद झाली नसल्याची माहिती विस्ताराधिकारी अशोक भांजे यांनी दिली. मंगळवारी होणारा दुसरा पेपर पुढे ढकलण्यात आल्याने आता थेट बुधवारी (ता. 9) दुसरा पेपर होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत पार पडली आहे. बहुतेक उपस्थित विद्यार्थ्यांना 20 पैकी 17 हून अधिक गुण मिळाल्याचेही बोलले जात आहे.

गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
आजारपण, कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबातील कोणीतरी कोरोनाग्रस्त आहे, अशा काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येऊ शकतात. त्या विद्यार्थ्यांना सध्या सुरु असलेली नियमित परीक्षा संपून निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा संधी दिली जाणार आहे. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, नुकसान होणार नाही हा बोर्डाचा हेतू आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे परीक्षेला संधी देण्यासंदर्भातील अर्ज करावा लागणार आहे.

दहावीच्या परीक्षेला केंद्रे वाढणार
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 358 केंद्रे असून 15 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्येच परीक्षेचे उपकेंद्र आहे. काही शाळांमध्ये केवळ दहावीपर्यंतचेच वर्ग असल्याने बारावीची परीक्षा केंद्रे कमी आहेत. परंतु, दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 909 केंद्रे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

Pune Adhik Maas Darshan Yatra : अधिक मासनिमित्त ST ची भाविकांना पर्वणी; पुणे विभागाकडून गणपतीपुळेसह तुळजापूर-गाणगापूर विशेष पॅकेज टूर सेवा सुरू

Video : नंदिनीचा खोटेपणा होणार आईसमोर उघड! मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही चक्रावले

Solapur: ZP अध्यक्षांना २० हजार, सभापतींना १२ हजार मानधन; पदाधिकाऱ्यांच्या प्रवास भत्ता अन् इंधनासाठी लाखोंची तरतूद

SCROLL FOR NEXT