Gramsevak
Gramsevak Canva
सोलापूर

हंगीरगे ग्रामसेवकाचा अनोखा उपक्रम ! झाडे लावून केला "क्वॉरंटाइन डे' साजरा

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला (Sangola) तालुक्‍यातील हंगीरगे येथील ग्रामसेवक बिभीषण सावंत (Gramsevak Bibhishan Sawant) हे पॉझिटिव्ह विचारांचे; परंतु ऐन कोरोना (Covid-19) काळात तेच कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले असताना 14 दिवसांचा कार्यकाल घरीच पूर्ण करून 14 दिवसांनंतर गावात त्यांनी 14 झाडे लावून (Tree Plantation) "क्वॉरंनटाइन डे' (Quarantine Day) हंगीरगेतील केदारलिंग मंदिरासमोर साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाची तालुक्‍यात सर्वत्र चर्चा होत आहे. (The gram sevak of Hangirge village celebrated Quarantine Day by planting trees)

हंगीरगे येथील ग्रामसेवक बिभीषण सावंत हे जिल्ह्यामध्ये "झाडवाले ग्रामसेवक बाबा' म्हणून परिचित आहे. झाडांवर प्रेम करून फळे, फुले दुसऱ्यांना खावयास देणारा हा अवलिया ग्रामसेवक आज कुठल्याही सण, उत्सव वा दु:खाच्या क्षणी झाडे लावूनच आगळा- वेगळा डे साजरा करीत आहे. आज पदरमोड करून हे ग्रामसेवक एकेका झाडाचे मोल हजार रुपये असतानाही झाडे लावणे, त्याला लोखंडी ट्री- गार्ड उपलब्ध करून देणे अशा अनेक गोष्टी स्वखर्चाने करीत आहेत. त्यांनी आपल्या घराजवळच स्वखर्चाने रोपवाटिका तयार केली आहे.

"झाडे आमची सगेयोयरे, झाड आहे तर मानवाची वाढ आहे, बाबांनो झाडे लावा- जोपासा' असे बाळकडू देणारे ग्रामसेवक बिभीषण सावंत हे 29 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच आयसोलेशन मध्ये राहू लागले. या 14 दिवसांमध्ये गावासह परिसरातील गावांमध्ये ज्या सुखद- दुःखद घटना घडल्या, त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी झाडे लावून त्यांचा हा वारसा तेवतच ठेवला. गुरुवारी 13 मे रोजी ग्रामसेवक सावंत यांच्या कोरोना आयसोलेशनचा 14 दिवसांचा कालखंड संपला. स्वतः कोरोनाची टेस्ट करून घेऊन गावातील केदारलिंग मंदिरासमोर वड, जांभूळ, पिंपळ, चिंच व अन्य प्रकारची 14 झाडे लावून आगळावेगळा असा "क्वॉरनटाइन डे' साजरा केला. यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे गावासह परिसरातील गावांमध्ये हा चर्चेचा विषय बनला. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक महत्त्व ऑक्‍सिजनचे वाढले आहे. ऑक्‍जिसनअभावी तरुणांसह वयोवृद्धांचे बेहोश हाल होताना आपण पाहात आहोत. तर डॉक्‍टर मंडळी आता औषधाच्या चिठ्ठीवर किमान एक तरी झाड लावा, असा मोलाचा सल्ला देत आहेत.

"ज्यास नाही घरदार, त्यास झाड देई मायेचा आधार' या उक्तीप्रमाणे ग्रामसेवक बिभीषण सावंत हे वृक्षलागवडीसाठी बेभान झालेले आहेत. मृत व्यक्तीच्या नावाने झाड, जन्मलेल्या बाळाच्या नावाने झाड, विवाहाप्रसंगी झाड, लेकीच्या नावाने झाड, वाढदिवसाचे झाड, अभिनंदनीय झाड, यासह अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये झाडे भेट देऊन, प्रत्यक्षात झाडे लावून ग्रामसेवक सावंत यांनी हा उपक्रम उखंडपणे सुरूच ठेवलेला आहे.

काल स्वत:चा 14 दिवसांचा क्वारंनटाइनचा कालखंड संपल्यानंतर झाडांच्या सान्निध्यातच राहून पालेभाज्या, फळे असा आहार खाऊन यांनी 14 वृक्षांचे रोपण केले. या वेळी सुभाष सावंत, दादासाहेब सावंत, बाबूराव पुकळे, अर्जुन लांडगे, बंडू लांडगे, अविनाश लांडगे, विनोद लांडगे, वसंत सावंत, शिवाजी चौगुले यांच्यासह युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT