माकपच्या कार्यकर्त्यांवरील पोलिस दडपशाहीचा निषेध : आडम मास्तर
माकपच्या कार्यकर्त्यांवरील पोलिस दडपशाहीचा निषेध : आडम मास्तर Canva
सोलापूर

माकपच्या कार्यकर्त्यांवरील पोलिस दडपशाहीचा निषेध : आडम मास्तर

श्रीनिवास दुध्याल

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कडक शासन करावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी केली.

सोलापूर : एकीकडे देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे शेतकरी पंतप्रधानांच्या दारात तीन कृषी काळे कायद्यांच्या विरोधात अविश्रांत लढाई करत आहेत, दुसरीकडे याच लढ्याच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर येथे शेतकरी आंदोलन करत असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा चिरंजीव आशिष मिश्रा हा नराधम माथेफिरू भरधाव वेगाने आंदोलकांवर गाडी चालवून त्यांना मारून टाकतो. ही माणुसकीला आणि लोकशाहीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. अशा या घटनेला कारणीभूत असणाऱ्या आशिष मिश्राला शिक्षा देण्याऐवजी आदरातिथ्य केला जातो, ही मोठी शोकांतिका आहे. राव अथवा रंक न्याय सर्वांना समान आहे. या कायद्याच्या नीतीचा विस्मरण न होता नि:पक्षपाती चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कडक शासन करावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माकपचे (MCP) माजी आमदार आडम (Narsayya Adam) यांनी केली.

11 ऑक्‍टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूर येथील शेतकरी आंदोलकांवर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन बंदमध्ये सहभागी झाला. महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलेली असताना सुद्धा पोलिस प्रशासनाकडून बंद हाणून पाडण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. सकाळी माकपचे कार्यकर्ते अनिल वासम व युसूफ शेख यांना राहत्या घरातून तर ऍड. एम. एच. शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, सलीम मुल्ला यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना दत्तनगर येथील कार्यालयातच नजरकैदेत ठेवले. तसेच माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घराबाहेर पोलिस कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला. पोलिसांच्या या दडपशाहीला चकवा देत जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पहिल्या टप्प्यात काही प्रमुख कार्यकर्ते नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, दाऊद शेख, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, वीरेंद्र पद्मा यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दुसऱ्या टप्प्यात नरसय्या आडम, एम. एच. शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नगरसेविका कामिनी आडम, अनिल वासम, आरिफा मणियार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चालत पूनम गेटवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यानंतर पोलिसांनी नरसय्या आडम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सदर बझार पोलिस ठाणे येथे दाखल केले.

या आंदोलनात म. हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, विल्यम ससाणे, नरेश दुगणे, बाबू कोकणे, बापू साबळे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, जावेद सगरी, दत्ता चव्हाण, शहाबुद्दीन शेख, दीपक निकंबे, श्रीनिवास गड्डम, वसीम मुल्ला, मुन्ना कलबुर्गी, प्रवीण आडम, भारत पाथरूट, बजरंग गायकवाड, अप्पाशा चांगले, विनायक भैरी, डेव्हिड शेट्टी, नागेश म्हेत्रे, आरिफ मणियार, सिद्धाराम उमराणी, मल्लिकार्जुन बेलियार, योगेश अकिम, नानी माकम, मल्लेशम कारमपुरी, नितीन कोळेकर, अंबादास गडगी, अंबादास बिंगी, श्रीनिवास तंगडगी हे सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT