beggars
beggars  esakal
सोलापूर

महापालिकेजवळच चिमुकल्यांसमवेत सिग्नलवर पैसे मागतात बेघर

तात्या लांडगे

सिग्नलवर भिक मागणारे कोण, शहरातील की बाहेरील, त्यांना नातेवाईक आहेत का, याचा शोधही प्रशासनाला लागलेला नाही.

सोलापूर: स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळवत असलेल्या सोलापूर शहरात आता सिग्नलवर भिक मागणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मंदिर, स्मशानभूमीसमोर मागून खाणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी प्रशासनाला निवेदनही दिले होते. मात्र, त्यात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सिग्नलवर भिक मागणारे कोण, शहरातील की बाहेरील, त्यांना नातेवाईक आहेत का, याचा शोधही प्रशासनाला लागलेला नाही.

महापालिकेचे कुमठा नाका परिसरात बेघर निवारा केंद्र आहे. शहरातील बेघर, सिग्नलवर भिक मागणाऱ्यांना शोधून त्यांची सोय बेघर केंद्रात करून त्यांना दोनवेळचे जेवण, चहा, नाष्टा, त्यांची राहण्याची सोय, कपडे, दररोज वापरायचे साहित्य पुरविण्यासाठी महापालिकेने एक संस्था नियुक्‍त केली आहे. दरवर्षी त्या संस्थेला अंदाजित नऊ लाख रुपये दिले जातात. तरीही, शहरात बेघर तथा भिक मागून खाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे. डफरीन चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गावरील मारुती मंदिर, रेल्वे स्थानक परिसरातील शनी मंदिर, मोदी स्मशानभूमीसह अन्य ठिकाणी अशा व्यक्‍तींची संख्या मोठी असल्याचे चित्र पहायला मिळते. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, परंतु स्वत:चा अथवा इतरांचा जीव धोक्‍यात घालून जगणे हा गुन्हा समजला जातो. त्या व्यक्‍तींना हक्‍काचा निवारा देणे हे त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नसल्याने शहरातील सिग्नलवर आणि मंदिर, स्मशानभूमीबाहेर भिक मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे.

महापालिकेच्या "बेघर'ची स्थिती

-एकूण क्षमता- 76

-सध्या असलेले बेघर- 26

-दरवर्षीचा अंदाजित खर्च- 12 लाख

भिक मागणाऱ्यांना कोरोनाचा धोका

महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरील डफरीन चौकात आणि विजयपूर रोडवरील पत्रकार भवन चौकासह अन्यत्र चिमुकल्यांना सोबत किंवा काखेत घेऊन भिक मागणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अनवाणी वावरणाऱ्या या लोकांच्या तोंडाला मास्कदेखील दिसत नाही. त्यांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतली आहे की नाही, याचीही माहिती प्रशासनाकडे नाही. सिग्नलच्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाल्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत ते वाहनधारकांना पैसे मागताना दिसतात. त्याठिकाणी वाहतूक पोलिस असतात, तसेच त्या मार्गावरून अनेक पोलिस व महापालिकेचे अधिकारी ये-जा करतात. तरीही, त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही हे विशेष.

शहरातील बेघरांना निवारा मिळावा या हेतूने महापालिकेच्या वतीने एक बेघर केंद्र उघडण्यात आले आहे. परंतु, अनेकजण तिथून पसार होतात. आता पुन्हा एकदा त्या व्यक्‍तींचा सर्व्हे करून त्यांना बेघर निवारा केंद्रात आणले जाईल.

- चंद्रकांत मुळे, शहर अभियान व्यवस्थापक, सोलापूर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT