मानेगावच्या शेतकरीपुत्राची कमाल ! टाकाऊपासून बनवला फवारणी पंप Canva
सोलापूर

मानेगावच्या शेतकरीपुत्राची कमाल ! टाकाऊपासून बनवला फवारणी पंप

मानेगावच्या शेतकरीपुत्राची कमाल ! टाकाऊपासून बनवला फवारणी पंप

वैभव देशमुख

माढा तालुक्‍यातील मानेगाव येथील शेतकरीपुत्र विश्वजित पाटील याने टाकाऊपासून टिकाऊ असणारा संजीवनी फवारणी पंप तयार केला आहे.

मानेगाव (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील (Madha Taluka, Solapur) मानेगाव येथील शेतकरीपुत्र विश्वजित पाटील (Vishwajit Patil) याने टाकाऊपासून टिकाऊ असणारा संजीवनी फवारणी पंप (Sanjeevani spray pump) तयार केला असून, त्याचा लोकार्पण सोहळा मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख दिनेश क्षीरसागर (Dinesh Kshirsagar) यांच्या हस्ते पार पडला. या स्प्रे पंपाचे वैशिष्ट्य म्हणजे हा बाजारामध्ये चार हजार रुपये किमतीचा पंप असून, तो इथे फक्त तीनशे ते चारशे रुपयांमध्ये तयार होत आहे.

यासाठी पाच लिटरचा ड्रम, लहान चार्जिंग बॅटरी, खेळण्यातील मोटार, सलाईनची लांब नळी व पुढे छोटे फिरणारे चक्र एवढ्या साहित्यावरच हा पंप चालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची मोठी बचत होणार आहे. तर या पंपाला दिवसातून एक तास चार्जिंग केल्यानंतर हा पंप बारा तास पूर्णपणे चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय परवडणारा असा हा फवारणी पंप असून सर्व शेतकरी बांधवांनी अशा पंपाचा उपयोग करून आपल्या शेतीमध्ये प्रगती करावी, असेही क्षीरसागरने सांगितले. या पंपाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या पंपामध्ये चार लिटर औषध बसते; मात्र चार लिटरमध्ये अर्धा एकर ते पाऊण एकर फवारणी सहज व सोप्या पद्धतीने करता येत आहे.

या वेळी राष्ट्रीय उद्योग आघाडीचे पोपट काळे, राष्ट्रीय प्रबोधनीचे अध्यक्ष शिवाजी पवार, शेतकरी संघटनेचे शिवाजी उबाळे, मारुती शिंदे, अमोल केसरे, कृषी सहाय्यक अनिल केदार, पंडित सांळुके, रवींद्र ताटे, भास्कर कदम आदी उपस्थित होते. या वेळी पोपट काळे व शिवाजी पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की नोकरीच्या मागे न लागता नवनवीन प्रयोग करून आपली प्रगती करावी. यातून वेळ व पैसा याची बचत होऊन नक्कीच तरुण शेतकऱ्यांसाठी मोठी संधी प्राप्त होणार आहे. या वेळी मोहोळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने खरीप पीक यावर परिसंवाद घेण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT