सोलापूरला दर्जा स्मार्ट सिटीचा अन्‌ नावलौकिक मात्र खड्डेपूरचा! Canva
सोलापूर

सोलापूरला दर्जा स्मार्ट सिटीचा अन्‌ नावलौकिक मात्र खड्डेपूरचा!

सोलापूरला दर्जा स्मार्ट सिटीचा अन्‌ नावलौकिक मात्र खड्डेपूरचा!

अभय दिवाणजी

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाच्या गतीबाबत सरकारी यंत्रणा समाधानी असली तरी स्थानिक पातळीवर नाराजीचा मोठा सूर आहे.

सोलापूर : स्मार्ट सिटीचा (Smart City) दर्जा मिळाल्यानंतर सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलेल असा कयास होता. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. परंतु स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या (Smart City Development Company) कामाच्या गतीबाबत सरकारी यंत्रणा समाधानी असली तरी स्थानिक पातळीवर नाराजीचा मोठा सूर आहे. सध्याची गती पाहता ही कामे पूर्ण होण्यास आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल, हे समजेनासे झाले आहे. दरम्यान, महापालिका (Solapur Municipal Corporation) आणि स्मार्ट सिटी कंपनीत निधीवरून कलगीतुरा रंगला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. स्मार्ट सिटीच्या अर्धवट रस्त्यांवर तसेच महापालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर खड्ड्यात पडून सोलापूरकर जखमी होऊ लागले आहेत. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे दररोजच काही ना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. (The status of Solapur as a smart city and the reputation is Khaddepur-ssd73)

2016 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सोलापूर शहरास स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला. तेव्हा मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देशात नववा अन्‌ राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने आनंदास भरते आले. लवकरच सोलापूर शहर चकाचक होईल, सोलापूरचे ब्रेन ड्रेन थांबेल, उद्योग वाढून रोजगार मिळेल असे वाटू लागले. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना झाली. क्रिसील नामक कंपनीची मुख्य सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. तब्बल एक हजार कोटींची कामे प्रस्तावित झाली. यातील काही कामे सुरूही झाली. काही कामे मार्गी लागली असून समांतर जलवाहिनीचे मोठे काम आता मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आहे. स्मार्ट सिटीची शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. समर्थ धोंडीबा भास्कर (वय 14) हा या रस्त्याचा बळी ठरला तर विद्युत बॉक्‍सचा धक्का लागून पूर्वा सागर अलकुंटे ही पाच वर्षांची बालिका मरण पावली. या दोन्ही घटना दुर्दैवीच म्हणाव्या लागतील. रस्त्याची कामे गतीने होणे अपेक्षित आहे. तर विजेच्या धक्‍क्‍याबाबत स्मार्ट सिटी कंपनी महावितरणकडे बोट दाखविते आहे. कोणाचीही जबाबदारी असली तरी बालिकेचा गेलेला बळी म्हणजे न भरून येणारे नुकसान आहे.

सोलापूर शहराचे क्षेत्रफळ 179 चौरस किलोमीटर आहे. यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 91.5 कोटींच्या निधीतून सोलापूर शहरातील राज्याच्या व महापालिकेच्या अखत्यारीतील 27 किलोमीटरचे रस्ते तयार केले. गेल्या कित्येक वर्षांपासून हे रस्ते दुर्लक्षितच आहेत. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. तसेच आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होऊ लागला आहे. काही रस्त्यांचे सुशोभीकरण खासगीकरणातून उत्साही सोलापूरकरांनी केले आहे. तर अनेक रस्त्यांच्या दुभाजकांची वाटच लागली आहे. त्यात काही ठिकाणी चिलार वाढल्याचे तर काही ठिकाणी दुभाजकांची दुरवस्था पाहावयास मिळत आहे. महापालिकेकडून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सोलापूरकरांवर संकटांची मालिका कोसळत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापालिकेच्या दप्तरी काहीच नोंद नसल्याची माहिती मिळत आहे. केवळ खड्डे आणि त्याची दुरुस्ती यासाठी वेगळीच यंत्रणा कार्यरत आहे की काय, असा संशय येतो आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक हजार 69 कोटींची कामे होत आहेत. यामध्ये रंगभवन चौकाचे सुशोभीकरण, स्ट्रीट बाजार, होम मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम (पहिला टप्पा), किऑस, स्मार्ट रोड, सोलारयुक्त इमारती, 13 किलोमीटर रस्त्यांपैकी काही कामे, ड्रेनेज, जलवाहिनी, 60 ई-टॉयलेट, 120 घंटागाड्या, सव्वा दोन लाखांच्या डस्टबिन, कचरा एकत्रित नेण्याची यंत्रणा (कॉम्पॅक्‍टर), स्ट्रीट लाईट, एलईडी पोलचे काम झाले आहे. या योजनेच्या निधीत महापालिकेचा 25 टक्के हिस्सा आहे. आतापर्यंत सरकारकडून 367.50 कोटीचा हिस्सा प्राप्त झाला आहे. समांतर जलवाहिनीसह एकूण 25 प्रकल्प शहरात होत असून महापालिकेने यासाठी आतापर्यंत 122.50 कोटींचा हिस्सा दिला आहे. उर्वरित हिस्सा मिळण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.

सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश जरी झालेला असला तरी नावलौकिक मात्र खड्डेपूरचा होत आहे. आध्यात्मिक पर्यटनासाठी सोलापूर जिल्हा राज्यात अन्‌ देशातही गौरवला जात आहे. परंतु अन्य भागातील पर्यटक या शहरात आल्यानंतर हिरमुसतात. याबाबत कोणालाही काहीही सोयरसुतक नाही, याचेच गम्य वाटते.

खराब रस्ते व खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

शहरामध्ये झालेल्या पावसानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे, स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कामांसाठी केलेल्या खोदाईत पावसाचे पाणी साचते. अनेक मुख्य रस्त्यांची दुरुस्ती व देखभालच नसल्याने त्यावरील खड्डे पाण्याने व वाहतुकीने अधिक रुंद होत आहेत. त्यामुळे दुचाकी स्लीप होणे, खड्ड्यात आदळणे, पाण्यात खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न येणे, दुचाकीवरचे संतुलन सुटणे असे प्रकार होत आहेत. रवींद्र वर्मा हे होटगी रोड भागातून जात असताना त्यांची दुचाकी रस्त्यावर स्लीप झाल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. न्यू बुधवार पेठेतील रहिवासी महेश मुकुंद शिंदे हे बाळे भागात ब्रीज येथून दुचाकीवर जात असता अचानक दुचाकी घसरून पडून जखमी झाले. ही काही अलीकडील काळातील वानगीदाखल उदाहरणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT