अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीवर परिणाम Canva
सोलापूर

अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीवर परिणाम

अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीवर परिणाम

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

सध्याच्या अफगाणिस्तानावरील तालिबानी वर्चस्वामुळे आगामी काळात केळी निर्यातीवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे.

केत्तूर (सोलापूर) : सध्याच्या अफगाणिस्तानावरील (Afghanistan) तालिबानी (Taliban) वर्चस्वामुळे आगामी काळात केळी निर्यातीवर (Banana exports) परिणाम होण्याची शक्‍यता व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण केळीपैकी तीस टक्के केळी अफगाणिस्तान येथे निर्यात केली जाते. परिणामी आगामी काळात अफगाणिस्तानातील परिस्थितीत सुधारणा नाही झाली, तर त्याचा फटका केळी निर्यातीवर होण्याची शक्‍यता आहे. सध्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील केळी उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात अफगाणिस्तानमधील 15 कंटेनरची केळीची ऑर्डर होती. परंतु अफगाणिस्तामधील तालिबानी वर्चस्वामुळे सुरू झालेल्या झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्याची माहिती केळी व्यापाऱ्यांनी "सकाळ'ला दिली.

जिल्ह्यातील केळीला एक प्रकारची विशिष्ट चव व उत्तम दर्जा असल्याने आखाती देशांसह इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील केळीला मागणी आहे. परंतु, कोरोना संसर्गजन्य रोगाबरोबर नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत असताना आता अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीत घट झाल्यास त्याचा फटका केळी उत्पादकांना बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक बंद राहिल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतरच्या काळात केळीच्या दरात तेजी निर्माण झाली आहे. परंतु, अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वानंतर तेथील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्‍यता फारच कमी आहे. अफगाणिस्तान हा इराण नंतरचा सर्वांत मोठा भारतातून केळी आयात करणारा देश आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात थांबल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे.

सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात अफगाणिस्तानमधील 15 कंटेनरची केळीची ऑर्डर होती. परंतु अफगाणिस्तामधील तालिबानी वर्चस्वामुळे सुरू झालेल्या झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. आता या केळींची निर्यात न झाल्यास खूप मोठ्या नुकसानीस केळी उत्पादक व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.

- संतोष बाबर, केळी व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

SCROLL FOR NEXT