सोलापूर

रुग्णांची वाहतूक करणारा योद्धा कोरोनाबाधित ! उपचारासाठी ग्रामस्थांनी जमवली दीड लाखाची मदत

सकाऴ वृत्तसेवा

शेटफळ गावचे सुपुत्र डॉ. सुहास लबडे यांच्या प्रयत्नातून बेड उपलब्ध होऊन बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चिखलठाण (सोलापूर) : कोविड काळात आपल्या गाडीतून परिसरातील तब्बल 312 कोरोना (Corona) रूग्णांची वाहतूक करणाऱ्या शेटफळ (ता. करमाळा) येथील कोविड योध्दालाच कोराना (Corona) संसर्ग झाला. हलाखीची परिस्थिती असल्याने उपचारासाठी गावातील तरूणांनी आवाहन करताच दोन दिवसात तब्बल दीड लाख रुपयांची (collected Rs 1.5 lakh) आर्थिक मदत जमा झाली. (The villagers have collected Rs 1.5 lakh for the treatment of the corona warrior of Shetfal)

सध्याच्या काळात कोरोना रूग्णांची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिका सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गेल्या वर्षभरापासून गावातील व परिसरातील तब्बल 312 कोरोना रूग्णाला उपचारासाठी घरापासून हॉस्पिटल व पुन्हा घरी आपल्या चारचाकी गाडीतून सोडवण्याचे काम करणाऱ्या शेटफळ येथील सोमनाथ माने (वय 28) यालाच कोरोनाने गाठले. श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्याने त्याला बार्शी येथे हलविण्यात आले. त्रास वाढल्याने व्हॅंटिलेटर बेडची गरज होती. अनेक प्रयत्न करूनही बार्शीत बेड उपलब्ध झाला नाही. शेटफळ गावचे सुपुत्र डॉ. सुहास लबडे यांच्या प्रयत्नातून बेड उपलब्ध होऊन बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या त्याची कोरोनाशी झुंज सुरू आहे. माने याची घरची परिस्थिती हालाखीची असून आजपर्यंत अनेक दिवस लोकांच्या खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम केले. गेल्या वर्षी गावातील मित्रमंडळींच्या सहकार्यातून एक जुनी चारचाकी खरेदी करून गावात गरजेच्या वेळी भाडे करण्याचे काम करत होता. गेल्यावर्षी लॉकडाउनमध्ये गाड्यांची भाडे कमी झाल्याने गाडी बसून राहीली. गाडीचे हप्ते फेडण्यासाठी गाडीला भाडे मिळणे गरजेचे होते. आशा वेळी त्याने गावातील व परिसरातील कोरोनाचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याचे काम करत होता. कधीही रात्री अपरात्री फोन केला की माने हजर व्हायचा. कोरोनाचे रूग्ण वाहतूक सुरू केल्यानंतर इतर लोकांनी त्याची गाडी भाड्याने घेणे बंद केले.

सध्या स्वतः ची काळजी घेत हेच काम तो करत होता. परंतु काहीसा गाफील राहिल्याने त्यालाच कोरोनाचा संसर्ग झाला. सध्या बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत उपचारांचा खर्च कुटुंबाच्या आवाक्‍यात नसल्याने गावातील तरूणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करताच गावातील ग्रामस्थांनी 50 रूपयापासून 20 हजार रुपयांपर्यंत मदत जमा केली. याबरोबरच इतर ठिकाणच्या लोकांकडूनही ऑनलाईनच्या माध्यमातून दिलेल्या बॅंक खात्यावरही भरघोस मदत केली. परिसरातील अनेक रूग्णांची सेवा केलेल्या या कोरोना योध्दाला अनेकांनी आपल्या सदिच्छा आर्थिक मदत केल्याने सध्याच्या काळातही माणुसकीचे दर्शन झाले तर यामुळे माने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

(The villagers have collected Rs 1.5 lakh for the treatment of the corona warrior of Shetfal)

बातमीदार : गजेंद्र पोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT