auto riksha 
सोलापूर

सावधान ! 'या' शहरात रिक्षा प्रवासात चोरीचे प्रमाण वाढले 

तात्या लांडगे

सोलापूर : अक्‍कलकोट रोड पाणी टाकी ते सूतमिल असा रीक्षातून प्रवास करताना चंद्रकांत रेवणसिध्द कोरे (वय- 65) यांच्याकडील पिशवीतील पर्समधून दोन तोळ्याचे 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण महिला चोरट्यांनी लांबवल्याची घटना (गुरुवारी) घडली. मागील वर्षभरापासून सातत्याने रीक्षा प्रवासादरम्यान चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसही हतबल झाले असून महिला चोर ओळखायच्या कशा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. 


नातेवाईक आनंद माने यांच्या मुलाचा 29 जानेवारीला विवाह पार पडला. त्यासाठी चंद्रकांत कोरे यांनी त्यांची सून लक्ष्मी दयानंद कोरे हिचे सोन्याचे गंठण मुलगी मुक्‍ताबाई परशुराम कोरे (रा. घोंगडे वस्ती) हिला वापरण्यास दिले. विवाहानंतर आता मुलीने वापरायला घेतलेले गंठण घ्यायला चंद्रकात कोरे अक्‍कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ आले. त्यांनी जावई परशुराम यांना फोन करुन त्याठिकाणी यायला सांगितले. जावयाकडून गंठण घेवून फिर्यादी रीक्षात बसले. तत्पूर्वी, रीक्षात चार अनोळखी महिला बसलेल्या होत्या. काहीवेळाने त्या महिलांनी ढकलाढकली सुरु केली. फिर्यादीचे लक्ष विचलित करुन त्यातील एका महिलेने फिर्यादीजवळील पिशवीत हात घालून पर्समधून सोन्याचे गंठण काढले. काही अंतरावर त्या महिला उतरल्या आणि फिर्यादी सुतमिलजवळ आल्यानंतर त्यांना समजले की, पिशवीतील गंठण गायब झाले आहे. त्यानंतर त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा नोंद केला. 


प्रवाशांनी नोंदवावा रिक्षाचा क्रमांक 
प्रवाशांनी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेल्या रिक्षातून प्रवास करणे टाळावे, आपल्याकडील साहित्य जपावे. ज्या रिक्षातून प्रवास करतोय, त्याचा नंबर नोंदवून ठेवा, चोरीची घटना घडल्यानंतर तपास करणे सोयीस्कर होईल. 
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्‍त, सोलापूर 


दारुला दोनशे रुपये दिले नाहीत म्हणून मारहाण 
सोलापूर, ता. 7 : घरातील झोपलेल्या सलीम रऊफ बागवान यांना हाक मारुन बाहेर बोलावून घेतले आणि दारु पिण्यास दोनशे रुपये मागितले. त्यावेळी सलीम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी शबीर शेख याने त्यांना मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या सलीम यांच्या आईला व बहिणीलाही आरोपीने मारले. त्यावेळी फिर्यादी सलीम यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीची आई व बहिणीने मार, त्याला सोडू नको असे म्हणून आरोपीला प्रोत्साहन दिले. त्या वेळी आरोपी शबीर शेख याने हातातील फायटरसारखे दिसणाऱ्या वस्तूने गालावर मारुन जखमी केले. या प्रकरणी सलीम बागवान यांनी आरोपी शबीर व त्याची आई आणि बहिणीविरुध्द एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT