BAJAR.jpg 
सोलापूर

......कमाईच्या आशेने त्यांचे चेहरे फुलले

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः शहरातील उद्योग व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर मधला मारुती व कुंभार वेस परिसरात मोठ्या दुकानांसोबत रस्त्यावर बसून माल विकणाऱ्या विक्रेत्यांनी माल मांडून त्याची विक्री सुरू केली. त्यासोबत अनेक दिवसांपासून खरेदी बंद असल्याने ग्राहकांनी देखील बाजारात मोठीच गर्दी केली होती. शहरातील विविध भागांत दुकाने व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली. 

सकाळपासूनच दुकानदारांनी सफाई सुरू केली होती. स्वच्छतेनंतर अनेक दुकानांत निर्जंतुकीकरणाची औषधी फवारणी करण्यात आली. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. मोठ्या दुकानांसोबत शिलाई कारागीर, भांड्यावर नाव टाकून देणारे कारागिर, लोखंडाचे भाते चालवणारे कामगार, फुलवाले, नारळवाले, सुया, मणी व पोत विकणाऱ्या महिला अशा कितीतरी लहान विक्रेते व कारगिरांची बाजारात गर्दी झालेली होती. 

दुकानासमोर वाहने लावून मालाची चढ-उतार केली जात होती. दुकानदार फोनवरून मालाच्या बुकिंगच्या कामाला लागले होते. दुकानात सकाळपासून माल लावण्याची कामे सुरू होती. दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी होती. दुकानमालकांनी पहिला दिवस असल्याने स्वतः दारात उभे राहून सॅनिटायझर ग्राहकाच्या हातावर दिले. अंडी विक्रेते, चप्पल दुरुस्ती, गाड्या दुरुस्ती कारागीर यासह कितीतरी प्रकारचे कारागिर बाजारात आल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. 
शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी व पादचाऱ्यांची वर्दळ यामुळे परिसर फुलून गेला होता. कापड, किराणा, चप्पल व बूट विक्री, होलसेल किराणा, शोभिवंत वस्तूंची दुकाने, रेडिमेड, जनरल स्टोअर्स आदी अनेक प्रकारची दुकाने उघडली गेली होती. 
दुकानात काही व्यापाऱ्यांनी तीन फुटांचे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी काउंटरसमोर दोरी बांधून सोय केली होती. जागरूक व्यापाऱ्यांनी या नियमाचे तंतोतंत पालन केले. तरीही बाजारपेठ सुरू झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढेल किंवा कमी होईल याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. बाजारात अगदी बोटावर मोजण्याइतक्‍या काही ऍटो उभ्या होत्या. ऍटोमध्ये प्रवासी जादा संख्येने घेणे कोरोना संसर्गामुळे शक्‍य नाही म्हणून रस्त्यावर अगदी तुरळक ऍटो धावत होत्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Delhi News : जंतर-मंतर कुणाचे?

SCROLL FOR NEXT