सोलापूर

'भिमा'ने थकविली FRP! सतेज पाटलांचा माजी खासदार महाडिकांशी पंगा

तात्या लांडगे

राज्यातील ज्या कारखान्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही, त्यांच्यावर कडक अ‍ॅक्‍शन घ्या, अशा सूचना साखर आयुक्‍तांना दिल्याची माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

सोलापूर: नैसर्गिक संकटांचा सामना करीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांनी वेळेत पूर्ण एफआरपी द्यावी. भिमा कारखान्यानेही एफआरपी दिली नसल्याच्या तक्रारी आहेत. मी स्वत: शेतकऱ्यांना पूर्णपणे एफआरपी देऊन पुन्हा एक हप्ता दिला आहे. राज्यातील ज्या कारखान्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही, त्यांच्यावर कडक अ‍ॅक्‍शन घ्या, अशा सूचना साखर आयुक्‍तांना दिल्याची माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

साखर कारखान्याला ऊस गेल्यानंतर 14 दिवसांत संबंधित शेतकऱ्याला एफआरपी देण्याचा कायदा आहे. मात्र, मागील गाळप हंगामातील संपूर्ण एफआरपी अजूनपर्यंत मिळालेली नाही, हे विशेष. शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत जप्तीची कारवाईदेखील केली जाते. परंतु, त्या कारवाईलाही विलंबच लागत असल्याची स्थिती आहे. बहुतेक कारखान्यांनी एफआरपीचे टप्पे पाडून शेतकऱ्यांना रक्‍कम द्यायचा पायंडा पाडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनीही कारखानदारी अडचणीत आल्याने कारखान्यांचा फॉर्म्युला मान्य केला. तरीही, कारखानदार पुढील टप्प्यातील रक्‍कम देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कुटुंबातील अडचणी घेऊन शेतकरी कारखानदारांकडे हेलपाटे मारत आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भिमा कारखान्याने एफआरपी दिली नाही, या प्रश्‍नावर उत्तर देताना स्पष्ट केले की, निश्‍चितपणे अशा कारखान्यांवर कारवाई होईल.

'गोकूळ'नंतर आता 'भिमा'वर लक्ष

'आमचं ठरलयं' म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महादेव महाडिक यांच्याकडील गोकूळ दूध संघ मिळविला. आता शेतकऱ्यांना वेळेत एफआरपीही देऊ न शकरणाऱ्या कारखान्यात पुन्हा शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' यावेत म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने भिमा कारखानाही ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. पुढच्या वर्षी भिमा कारखान्याची निवडणूक होणार आहे. कोल्हापुरातील सतेज पाटील विरुध्द माजी खासदार मुन्ना महाडिक यांचा संघर्ष आता सोलापूर जिल्ह्यातही भिमा कारखान्याच्या माध्यमातून पहायला मिळेल, अशी चर्चा आहे.

साखर कारखान्यांनी द्यावी पूर्ण एफआरपी

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून त्यांना दररोज अतिवृष्टी, महापूर, शेतमालाचे दर अशा विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. रक्‍ताचे पाणी करून पोटाला चिमटा घेऊन त्यांनी पिकवलेल्या उसाची एफआरपी संपूर्ण साखर कारखान्यांनी वेळेत द्यावी, असे आवाहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. 'भिमा' साखर कारखान्यानेही शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी दिलेली नाही, कामगारांच्या पगारी दिलेल्या नाहीत, अशा तक्रारी येत आहेत. परंतु, संबंधित सर्वच कारखान्यांकडील एफआरपी शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यादृष्टीने साखर आयुक्‍तालयांना सूचना केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

Bride Runs Away With Cash : लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरी फरार; पती मिठाई आणायला जाताच रस्त्यात सोडून दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती?

Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; फार्महाऊसवर लपलेल्या संस्थाचालकाला अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Local: लोकलचा स्पीड आणखी वाढणार, दररोज ४,००० फेऱ्या; रेल्वे प्रशासनाची नवी योजना, कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT