Bullet Train
Bullet Train Sakal
सोलापूर

Solapur : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल नाहीच!

श्रीनिवास दुध्याल

मुंबई- पुणे- सोलापूर- हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात कोणताही बदल होणार नसल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन येथील विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

सोलापूर : सामान्य जनता, व्यावसायिक व उद्योजकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई (Mumbai)- पुणे (Pune)- सोलापूर (Solapur)- हैदराबाद (Hyderabad) या नियोजित मार्गात बदल करून मराठवाडा, विदर्भमार्गे बुलेट ट्रेन (Bullet train) सुरू करावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे देत मुंबई- जालना (Jalna)- नांदेड (Nanded) या मार्गाची मागणी केली आहे. परंतु, मुंबई- पुणे- सोलापूर- हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात कोणताही बदल होणार नसल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (National High Speed Rail Corporation) येथील विश्‍वसनीय सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

मुंबई- हैदराबाद या 711 किलोमीटरच्या मार्गासाठी काही महिन्यांपूर्वी लिडार सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर मागील दोन महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील 61 गावांतील जवळपास 14 हजार नागरिकांचा सामाजिक सर्व्हे पूर्ण करण्यात आलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाचा एप्रिल 2022 पर्यंत डीपीआर अर्थात डिटेल्स प्रोजेक्‍ट रिपोर्ट सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई- जालना- नांदेड- हैदराबाद या मार्गाची मागणी केली आहे. मात्र मुंबई- नागपूर या मार्गावर जालना जिल्ह्याचा समावेश असणार आहे. त्यामुळे मुंबई- पुणे- हैदराबाद या मार्गात बदल होणार नाही. पुणे येथील मोनार्च सर्वेअर इंजिनिअरिंग कन्सल्टंट, पुणे या कंपनीकडून मुंबई ते गुलबर्गापर्यंत सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गात कोणताही बदल होणार नसून, या मार्गाचे डीपीआर अर्थात डिटेल्स प्रोजेक्‍ट रिपोर्ट बनविण्याचे काम सुरू आहे. रेल्वे बोर्डास एप्रिल 2022 पर्यंत डीपीआर सादर करण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक बाबी...

  • मुंबई- पुणे- हैदराबाद मार्गाचे झाले हवाई सर्वेक्षण

  • सोलापूर जिल्ह्यातील 61 गावांतील 14 हजार नागरिकांचा सामाजिक सर्व्हे पूर्ण

  • सहा तालुक्‍यातील 311.831 हेक्‍टर जमीन होणार बाधित

  • सोलापूर, पंढरपूर येथे असणार स्थानक

  • एप्रिल 2022 पर्यंत सविस्तर अहवाल केला जाणार सादर

पुढील प्रक्रिया लवकरच

माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट या सहा तालुक्‍यांत सामाजिक सर्व्हे, हवाई सर्व्हे करण्यात आलेला आहे. त्यामुळे मार्गातील जमीन बाधित होणाऱ्या नागरिकांना या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली असून, लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे 17.5 मीटर रुंद जमिनीचे भूसंपाद केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT