FRP 
सोलापूर

"या' साखर कारखान्यांकडे गतवर्षीच्या "एफआरपी'चे अद्यापही "इतके' कोटी थकीत !

प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : राज्यातील 19 साखर कारखान्यांकडे 15 ऑगस्ट 2020 अखेर मागील हंगामातील "एफआरपी'चे 81.89 कोटी रुपये अद्यापही थकीत आहेत. तसेच 2018-19 च्या हंगामातील 66 कारखान्यांकडे 243.83 कोटी रुपये एफआरपीची अजूनही थकबाकी आहे. साखर आयुक्तालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. 

गतवर्षी राज्यात 145 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्याद्वारे राज्यात 550.29 लाख टन उसाचे गाळप झाले होते. या सर्व उसाची एकूण देय एफआरपी 13952.06 कोटी रुपये आहे. त्यापैकी 13870.17 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. कारखान्यांकडे अद्याप 81.89 कोटी रुपये थकले आहेत. मागील वर्षी गाळप झालेल्या उसाची 126 कारखान्यांनी 100 टक्के, 12 कारखान्यांनी 99.99 टक्‍क्‍यांपर्यंत, चार कारखान्यांनी 79.99 टक्‍क्‍यांपर्यंत तर तीन कारखान्यांनी 59.99 टक्‍क्‍यांपर्यंत एफआरपी दिली आहे. गतवर्षीच्या थकीत एफआरपीबद्दल एकाही कारखान्यावर आर. आर. सी. अंतर्गत (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई झालेली नाही. 

2018-19 च्या हंगामात राज्यात 195 कारखान्यांनी 952.11 लाख टन उसाचे गाळप केले होते. या उसाची एकूण एफआरपी 23207.28 कोटी रुपये होती. त्यापैकी 22645.26 कोटी रुपये एफआरपी 15 ऑगस्ट 2019 पर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली होती. 129 कारखान्यांनी या हंगामातील 100 टक्के एफआरपी दिली आहे. 66 कारखान्यांकडे अद्यापही 243.83 कोटी रुपये एफआरपीची थकबाकी आहे. या हंगामात 76 कारखान्यांवर आर. आर. सी. अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 

यंदा 92.58 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज 
2020-21 च्या हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडे उपलब्ध असलेल्या सांख्यिकीनुसार राज्यात 10.66 लाख हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. त्यातून 815 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. यंदाच्या हंगामात 11.30 टक्के साखर उतारा मिळून 92.58 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT