advocate solapur
सोलापूर

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी ‘हे’ तिघे इच्छूक, पण लढत दुरंगीच! बुधवारपासून अर्ज विक्री, ३० जूनला मतदान, वाचा निवडणूक कार्यक्रम...

सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून १८ व १९ जून रोजी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होईल. २३ व २४ जून रोजी अर्ज माघारीनंतर ३० जून रोजी मतदान होईल. अध्यक्षपदासाठी ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. राजेंद्र फताटे व ॲड. शिवशंकर घोडके इच्छुक आहेत. ॲड. फताटे यांनी अध्यक्षपदासाठी यापूर्वी तीन निवडणुका लढल्या, पण त्यांना यश आले नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून १८ व १९ जून रोजी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होईल. २३ व २४ जून रोजी अर्ज माघारीनंतर ३० जून रोजी मतदान होईल. अध्यक्षपदासाठी ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. राजेंद्र फताटे व ॲड. शिवशंकर घोडके इच्छुक आहेत. ॲड. फताटे यांनी अध्यक्षपदासाठी यापूर्वी तीन निवडणुका लढल्या, पण त्यांना यश आले नाही. ॲड. जाधव हे पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहेत. तर ॲड. घोडके हे यापूर्वी तीनवेळा अध्यक्ष राहिले असून ते आता चौथ्यांदा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

बार असोसिएशनचे एकूण एक हजार ५०० ते एक हजार ५५० मतदार आहेत. या निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी ज्या उमेदवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभारतील, त्यांचे पारडे जड असणार आहे. ॲड. घोडके यांचा अनुभव दांडगा असून यापूर्वी ते तीनवेळा अध्यक्ष राहिले आहेत. या निवडणुकीत ते उमेदवारी कायम ठेवतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ॲड. फताटे यांना बारच्या निवडणुकांचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना यंदा विजयाची खात्री आहे. तर यापूर्वी बारचे उपाध्यक्ष व खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲड. जाधव यांचा विजय पक्का मानला जात असून तशी रणनिती त्यांनी आखल्याची चर्चा आहे. बार असोसिएशनचा पुढचा अध्यक्ष कोण, याचे उत्तर ३० जून रोजी समजणार आहे.

या निवडणुकीत सचिवपदासाठी ॲड. महेश गौडानवरू, ॲड. मंजुनाथ कक्कळमेली, ॲड. विक्रम वडगावकर, खजिनदार पदासाठी ॲड. अरविंद देढे, ॲड. संतोषकुमार बाराचारे, उपाध्यक्ष पदासाठी ॲड. नागनाथ बिराजदार, ॲड. परवेज ढालायत, ॲड. रविराज सरवदे, ॲड. परमानंद जवळकोटे व ॲड. रियाज शेख इच्छुक आहेत. सहसचिवपदासाठी ॲड. मीरा सिंग व ॲड. प्रियंका गोरंटी या इच्छुक आहेत. ॲड. सिंग यांना मागील निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. बार असोसिएशनची निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता असून त्यात कोणकोण उमेदवार असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

निवडणूक कार्यक्रम असा....

  • १६ जून : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

  • १७ जून : आक्षेप, हरकती

  • १८ जून : अंतिम मतदार यादी

  • १८ व १९ जून : अर्ज विक्री व स्विकृती

  • २० जून : पात्र उमदेवारांची यादी प्रसिद्ध

  • २३ व २४ जून : अर्ज माघार

  • २५ जून : अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध

  • ३० जून : मतदान (६ वाजेपर्यंत), मतमोजणी

मृत सभासदांच्या वारसांना २५ हजारांची मदत

सोलापूर बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेने मृत सभासदांच्या वारसांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे सचिव ॲड. मनोज पामूल यांनी तसा प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी अध्यक्ष ॲड. व्ही. पी. शिंदे, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे, सचिवा ॲड. निदा सैफन यांच्यासह सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईतील कोंडी कायमची फुटणार! 'या' भागात नवा उड्डाणपूल उभारणार; वाचा सविस्तर

Agriculture News : द्राक्ष उत्पादनाचे नुकसान कागद उद्योगालाही भोवले! मागणीत तब्बल ७० टक्के घट, २१ कोटींवर फिरले पाणी

Latest Marathi Breaking News : मनमाडमध्ये सराफा बाजार बंद; लहान मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

Jaysingpur Politics: निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमिगत नेते पुढे; सोशल मीडियावर चमक, गल्ल्याबोळात अचानक वावर वाढला!

Panchavati Election : पंचवटी भाजपचा हक्काचा प्रभाग, पण मतदारांचा अपेक्षाभंग! महापौर, सभापती पदे मिळूनही पाणी, उद्यानांचा प्रश्न कायम

SCROLL FOR NEXT