Theaf. 
सोलापूर

चोरट्याने लढविली शक्‍कल ! खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी 

तात्या लांडगे

सोलापूर : जुना विडी घरकुल परिसरातील भाग्य नगरातील श्रीकांत जनार्दन इंजामुरी यांच्या घरातून साड्या, शालू, पर्समधील रोकड व मोबाईल असा मुद्देमाल चोरट्याने शक्कल लढवून लंपास केला आहे. 33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद इंजामुरी यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. 

शुक्रवारी (ता. 9) पहाटे तीनच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. त्यावेळी बांबूला तारेचा आकडा टाकून कोणीतरी शिडीच्या साह्याने खिडकीत चढले. त्यानंतर खिडकीत हात घालून बेडरूममधील भिंतीला अडकवलेली पॅन्ट ओढून घेतली. पॅन्टमधील पैसे तर फरशीवरील बॅग ओढून त्यातील मोबाईल चोरला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. पवार करीत आहेत. 

शहर पोलिसांनी वसूल केला आठ लाख 99 हजारांचा दंड 
शहरातील बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने शहर पोलिसांनी सात पोलिस ठाण्याअंतर्गत कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार 17 ऑगस्ट ते 10 ऑक्‍टोबर या काळात बेशिस्त वाहनचालकांसह विनामास्क फिरणाऱ्यांकडून आठ लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांनी सुमारे नऊ हजार व्यक्‍तींविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

माहेरून पैसे आणण्यावरून विवाहितेचा छळ 
बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्यांनी छळ केल्याची फिर्याद संजीवनी साईनाथ जगताप यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. तत्पूर्वी, पतीचे पहिले लग्न झाल्याची माहिती लपवून सासरच्यांनी विवाह लावला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. माहेरून पैसे आणण्यावरून मानसिक, शारीरिक त्रास देत उपाशीपोटी ठेवले. शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी साईनाथ विजय जगताप, मालती विजय जगताप, विजय किसन जगताप, नीलेश विजय जगताप (सर्वजण रा. गजानन नगर, सहारा नगराजवळ, मजरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मूळ मालकाच्या परस्पर विकली वाहने 
जुळे सोलापुरातील शिवरत्न नगरातील ओंकार दत्तात्रय ढेकळे यांनी दोन वाहने (एमएच- 13, सीटी- 3344 आणि एमएच- 13, डीएच- 3344) घेतली होती. त्यानंतर ओळखीच्या मदार पैगंबर शेख (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) याला चालू स्थितीत फायनान्सचे हप्ते फेडल्यानंतर त्यांच्याकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र घेण्याचे ठरले. त्यानंतर दोन्ही वाहने शेख याने विकत घ्यायचे ठरले. त्याबाबत नोटरी करण्यात आली. मात्र, चालविण्यासाठी घेतलेली दोन्ही वाहने परस्पर विक्री करून 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद ढेकळे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. 

चारचाकीची मालट्रकला धडक 
येथील धोत्रीकर वस्तीसमोर जुना तुळजापूर नाका ते मार्केट यार्ड रोडवर मालट्रक (एमएच- 18, एए- 6156) थांबली होती. ट्रकचालक शैलेश महेंद्र बेंदे हा पत्ता विचारत असताना पुण्याकडून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या कारने (एमएच- 12, डीई- 4044) मालट्रकला मागून धडक दिली. त्या कारमधील ऋषीकेश वीरसंगप्पा कुपस्ता (रा. बिबेवाडी, पुणे) याच्या मृत्यूस कारचालक कारणीभूत ठरला. स्वत:ही जखमी झाला आणि कारच्या नुकसानीस कारणीभूत ठरला, अशी फिर्याद पोलिस शिपाई विशाल सर्वगोड यांनी जोडभावी पोलिसांत दिली. या प्रकरणी सचिन उत्तमराव बाबर (रा. धनकवडी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT